Junnar
Junnar 
पुणे

जुन्नर - तालुक्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आज जुन्नर तालुक्यातील एकूण 5 केंद्रावर सुरळीत पणे सुरु झाली. या परीक्षेसाठी सुमारे 4 हजार 446 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत.

जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालय केंद्राची विद्यार्थी संख्या 1835, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर केंद्र विद्यार्थी संख्या - 709, ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे केंद्र विद्यार्थी संख्या - 1052, पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा केंद्र विद्यार्थी संख्या - 499 आणि बेल्हेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेल्हे परीक्षा केंद्र विद्यार्थी संख्या -351 अशी आहे. तालुक्यात या पाच ठिकाणी परीक्षा केंद्रे असून पाचही केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी म्हणून सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
परीक्षा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यात तीन भरारी पथके स्थापन केली आहेत. केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व केंद्रसंचालक यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

जुन्नर तालुक्यातील केंद्रांचे बाबतीत तसेच परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संबंधितांनी गटशिक्षणाधिकारी तथा कष्टोडीयन के. डी. भुजबळ मो.क्र.९८२२८०२०१९  यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT