sanjay raut
sanjay raut 
पुणे

थापाडया भाजपला जनतेने घरी बसविण्याची वेळ : संजय राऊत

सकाळवृत्तसेवा

हडपसर : हडपसर विधानसभेच्या आमदाराने अठराशे कोटींची कामे केली, अशी थापा मारून त्याची जाहिरात केली. भाजपची पंरपंराच थापा व जाहिरातबाजीची आहे. थापाडया भाजपला आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिरूर लोकसभा आणि हडपसर विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल. यासाठी मतदरांनी जागृत व्हावे, असे अवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र २६ महमंदवाडी कौसरबागमधील सुमारे १८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख महादेव बाबर, गटनेते संजय भोसले, उपशहरप्रमुख समीर तुपे, संघटक अमोल हरपळे, नगरसेवक प्रमोद नाना भानगीरे, नगरसेविका संगीता ठोसर, प्राची आल्हाट, विभागप्रमुख संजय शिंदे, बाळासाहेब भानगीरे, माजी नगरसेवक  तानाजी लोणकर, विजय देशमुख, वैष्णवी घुले, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी सहाशे कोटी जनतेने मतदान केले असे परदेशात खोटे बोलले, मोदींनी चहा विकल्याचा पुरावा दाखवावा, हे सरकार थापड्यांचे सरकार आहे. १७ व्या वर्षी घर सोडले. मग चहा विकायला आले कधी असा सवालही त्यांनी यावेळी केला. खासदार आढळराव पाटील यांच्यावर कटाक्ष टाकून ते म्हणाले, शिरूरमध्ये नरेंद्र मोदींना उभा करण्याचा आग्रह करा, ट्रम्प सोडा सध्याच्या पंतप्रधान आले तरी त्यांची अनामत रक्कम जप्त होईल. मुंबईत कामांवर शिवसेना राज्य करत आहे. हडपसर विधानसभा व लोकसभा शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, लाटेमध्ये योगेश टिळेकर निवडून आले ती वावटळ होती, २०१४ चा सूड घेतला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.  

आढळराव पाटील म्हणाले, की हडपसरमधील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाचा केंद्राच्या संरक्षण खात्याकडून मंजुरी आणली. पालिकेने १० कोटींची तरतूद केली आहे. सय्यदनगर, मांजरी, लुल्लानागर उड्डाणपूल मंजुरीसाठी पाठपुरावा केला आहे. बकरी हिल येथील पाणी प्रकल्प मार्गी लागेल, हडपसरचे भाजपचे आमदार लोकांना व बांधकाम व्यावसायिकांना छळण्याचे काम करीत आहेत. भाजपाचे हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ९० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, हडपसरच्या आमदाराला आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. 

यावेळी नगरसेवक नाना भानगीरे व प्राची आल्हाट यांनी प्रभागातील विकास कामांची माहिती दिली. आभार जयसिंग भानगिरे यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT