arrested 
पुणे

पिंपरीत पिस्तुलासह एकास अटक 

संदिप घिसे

पिंपरी : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकास पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री पिंपरीत घडली. अतुल सुरेश डावरे (वय 28, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पिंपरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्‍ती पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून वैभवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून अतुलला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली.

अतुल काळेवाडी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. तो अल्पवयीन असताना त्याच्यावर हाणामारीचा एक गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याने हे पिस्तूल कोठून आणि कशासाठी आणले याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर, पोलिस हवालदार नागनाथ लकडे, शाकिर जिनेडी, महादेव जावळे, नीलेश भागवत, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

National Sports Day: २९ ऑगस्टलाच राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा होतो? महान खेळाडूची एक महान गाथा...

Maharashtra Monsoon Prediction : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव, चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप - राहुल गांधी

Sugar Price: साखर स्वस्त होणार? 2 लाख टन साखर घेऊन 4-5 जहाजे भारताकडे रवाना; सणासुदीपूर्वी मिळणार दिलासा

SCROLL FOR NEXT