crime
crime 
पुणे

पुणे : पिंपरीत वाहनचोरांकडून चार गुन्हे उघडकीस

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) : पळून चाललेल्या वाहन चोरांचा पाठलाग करून पिंपरी पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. या वाहन चोरांकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. 
सतीश दादाराव लोंढे (वय 22, रा. यशवंतनगर, पिंपरी), संतोष बबन लोंढे (वय 29, रा. गवळीमाथा, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही चोरीची एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला पोलिस गस्त घालत असताना डॉ. डी. वाय. पाटील परिसरातून एका दुचाकीवरून दोघेजण वेगात जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते आणखी वेगात पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पळून जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दुचाकीची कागदपत्रे मागितली असता आपल्याकडे कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पिंपरी पोलिस ठाण्यात आणून विश्‍वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सदरची दुचाकी चोरीची असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच आणखी दोन दुचाकी चोरी केल्याची कबुलीही दिली. 

पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. तसेच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. वाहन चोरांकडून पिंपरी पोलिसांनी एक लाख 40 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर, पोलिस हवालदार नागनाथ लकडे, शाकीर जिनेडी, राजेंद्र भोसले, महादेव जावळे, दादा धस, नीलेश भागवत, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी, अविनाश देशमुख, संतोष भालेराव, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT