Marathi News Pune News Pune Railway timetable New Trains
Marathi News Pune News Pune Railway timetable New Trains 
पुणे

पुणे-काझीपेठदरम्यान आजपासून सुपरफास्ट रेल्वे

सकाळवृत्तसेवा

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे ते काझीपेठ व्हाया चंद्रपूर ही नवी साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन (22151) करण्यात आली आहे. उद्यापासून प्रत्येक शुक्रवारी रात्री 9.45 मिनिटांनी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी ती काझीपेठ येथे गाडी पोचेल. 

यापूर्वी पुण्यातून काझीपेठला जाण्यासाठी कोणतीही गाडी नव्हती. पुणे-नागपूर या रेल्वेने नागपूर येथे जावे लागत होते. तेथून दुसरी रेल्वे अथवा बस पकडून वर्धा-काझीपेठला जावे लागत असे. त्यामुळे प्रवाशांना खर्च आणि वेळ अधिक लागत असे. ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पुण्यावरून निघाल्यानंतर ही गाडी शनिवारी सकाळी 10.22 मिनिटांनी वडनेरा, चंद्रपूर येथे दुपारी एक वाजून 37 मिनिटे आणि दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी बल्लारशाह येथे पोचेल. ही गाडी (22152) काझीपेठ येथून रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निघेल. ती सोमवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी पुण्यात पोचेल. ही साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन दोन्हीकडे पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, शिरपूर, रामगुंडम, पेठापल्ली आणि काझीपेठ असे थांबे घेत जाणार आहे. या गाडीसाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अनेक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण झाली आहे; परंतु ती साप्ताहिक असून, ही गाडी दररोज मार्गावर धावणे गरजेचे आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली. या गाडीला जळगाव आणि चाळीसगाव येथेदेखील थांबा देणे आवश्‍यक आहे, असेही त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT