sangavi
sangavi 
पुणे

पुणे-जुनी सांगवी परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी 

रमेश मोरे

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी व परिसरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दापोडी येथील पिंपरी चिंचवड काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलच्या वतीने तानाजी काटे, वसंत मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय किंडरे, भानुदास शिवले, रामचंद्र काटे आदी उपस्थित होते.

तर जय शिवाजी व्यायाम मंडळ, दापोडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मयुर बारटक्के, राकेश सातव, विश्वास चौगुले, सुर्यकांत वाझे, अमोल निचल आदी शिवप्रेमी उपस्थित होते. ओम साई फाऊंडेशन व पिंपळेगुरव येथील ममता अंध व अनाथाश्रमातील मुलांनी दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दत्तात्रय भोसले, संजय मराठे, जवाहर ढोरे, दिपक माकर, नथुराम ढोकळे, आकाश साळवे, नितीन शेवाळे, शंकर भोईटे, संतोष शेळके, तुषार कांबळे आदि उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी दापोडी च्यावतीने शेखर काटे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रवि कांबळे, अभिमन्यु काटे, मयुर काटे, अक्षय गबदुले, अमर काटे, इरफान शेख, संजय लांडे आदी उपस्थित होते. येथील रमेश दादा बागवे प्रतिष्ठान  यांच्या वतीने सांगवी 
येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

प्रा.ज्ञानदेव भगत यांच्या हस्ते छत्रपति शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रंसगी जेष्ठ नागरीक संघाचे  वासुदेव मालुतुमकर आहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सचिव कृष्णराव गिरगुणे  पुणे जिल्हा मांतग एकता आंदोलनाचे उपाध्यक्ष शेषराव कसबे सामाजिक कार्यकते शशिकांत आगरवाल, सनी कसबे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन - मावळ लोकसभा युवा कॉग्रेंसचे सरचिटणीस कुंदन कसबे यांनी केले. तर सायंकाळी ६ वाजता येथील शितोळेनगर गणपती मंदीरापासुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य संयुक्त मिरवणुक काढण्यात आली. येथील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात मिरवणुकीची सांगता करण्यात आलीे. या दरम्यान जेष्ठ इतिहास संशोधक अॅड. अनंत दारवटकर यांचा सांगवीकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या उत्सवास संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष अभिमन्यु पवार, डॉ. राजाभाऊ भैलुमे उपस्थित होते. या संयुक्त शिवजयंती उत्सवाचे येथील समता बुद्ध विहार, बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवमुद्रा प्रतिष्ठाण,जगदंब महिला मंडळ, सावित्रीबाई फुले महिला संस्था, प्रियदर्शनी नगर मित्र मंडळ, विश्वरत्न सोशल ग्रुप, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, पंचशील धम्म ग्रुप, माता रमाई महिला मंडळ, जय महाराष्ट्र गुजराथी संघ इत्यादींनी आयोजन केले होते.  संयुक्त शिवजयंती उत्सवाचे मुख्य प्रवर्तक नगरसेवक संतोष कांबळे, सुर्यकांत ऊर्फ कांता कांबळे, बहुजन क्रांती मोर्चाचे सुर्यकांत वराडकर, मराठा सेवा संघाचे पंकज पाटील, संभाजी ब्रिगेडचे अजय भोसले आदींनी मिरवणुकीचे संचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT