Walchandnagar
Walchandnagar 
पुणे

गुलाबपुष्प देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : निमसाखर (ता.इंदापूर) येथील निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीची परीक्षा सुरळीत सुरु झाली. शाळा समितीचे अध्यक्ष डॉ.एन.जी.रणवरे व संस्थेचे सचिव रवींद्र रणवरे यांनी गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

आज बुधवार (ता. २१) पासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या एचएचसीच्या परीक्षेला सुरवात झाली. निमसाखर येथील एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमधील परीक्षा केंद्रावरती आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. या परीक्षा केंद्रावर पिराळे येथील समता महाविद्यालय व एन.ई.एस.हायस्कूल निमसाखर मधील ३५६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यावेळी सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख आर.एस.तावरे, विस्ताराधिकारी एस.वाय.आसबे, प्राचार्य नवनाथ बागल, केंद्रसंचालक चंद्रकांत बोंद्रे, मधुकर खरात, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पांडुरंग पानसरे, अश्विनी रणवरे आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT