accident
accident 
पुणे

पुणे: हडपसरजवळ ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

संदीप जगदाळे

हडपसर : सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीस वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जगदंबा हॉटेल समोर झाली. 

सुरेश तुळशीराम घाटोळ ( वय ३० रा. शिवशक्ती चौक, भेकराईनगर, मूळ रा. परभणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटोळ हे कामावरून दुचाकी वरून घरी येत होते. सासवड रोड हा नेहमी प्रमाणे वाहतूक कोंडीने भरला होता. रस्त्यावर  वाहने एका मागोमाग येत होती. त्यावेळी ट्रकचा धक्का दुचाकीला लागला व  दुचाकी एका बाजूला पडली आणि दुचाकीस्वार हा ट्रकच्या चाका खाली आला. त्यामुळे ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट होते. मात्र ते  दुचाकीच्या हॅंडला लावले होते. 

सासवड रोड वर मागील पंधरा दिवसात चार अपघात होऊन पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावर संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सासवड रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटना स्थळी नागरिकांना व वाहतुक कोंडी सुरळीत केली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात आपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

सासवड रस्त्यावरील खड्ड्यांनी वीस दिवसात घेतला पाचवा बळी
गेल्या पंचवीस दिवसात सासवड रसत्यावर झालेल्या अपघातात पाच निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेली खडी आणि साई़ड पट्टयांचे रखडलेले काम यामुळे यामार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यातच या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच रोड छोटे-मोठे अपघात या मार्गावर होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता नुकताच वर्ग झाला आहे. आता तरी या रसत्याचे रूंदीकरण व दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. 

या मार्गावर खड्डे बुजवून मलपट्टी करण्याचे काम झाले. मात्र वर्दळीचा रस्ता असल्याने हे खड्डे पून्हा उघ़डले आहेत. रसत्यावर जागोजागी खडी पसरली आहे. त्यामुळे पून्हा ये-या माज्या मागल्या, अशी स्थिती या मार्गावर आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील तुकाईदर्शन, आयबीएम कंपनी, गंगानगर चौक, भेकराईनगर, विठ्ठल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे उड्डाणपुल ते मंतरवाडी चौक, उरुळी देवाची चौक आदी चौकात मोठे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT