shruti-pandit
shruti-pandit 
पुणे

दिव्यांग श्रुती पंडीत १२वीच्या परिक्षेसाठी सज्ज 

रमेश मोरे

जुनी सांगवी - शितोळेनगर येथील श्रुती श्रीकांत पंडीत ही विशेष विद्यार्थीनी आता प्रौढ लेखनिकासह बारावीच्या परिक्षेस सज्ज झाली आहे. श्रुती ही विशेष विद्यार्थीनी असल्याने ती ईतर सर्वसामान्य मुलामुलींप्रमाणे लिहु व बोलु शकत नाही. तसेच तिला लगेच समजेल असेही नाही. याच गोष्टींमुळे आठवीनंतर तिचे शाळेत जाणे थांबले. परंतु वडील श्रीकांत पंडीत व आई सौ.माधवी पंडीत यांनी आपल्या मुलीने शिकावे, तिला ईतरांप्रमाणे स्वताच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी मनाशी खुणगाठ बांधली. त्यांनी मार्च २०१६मध्ये दहावी परिक्षेचा सतरा नंबर अर्ज भरून श्रुतीला दहावीला बसवले. दहावी परिक्षेत श्रुतीला ५० टक्के गुण मिळाले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर आता तिने 12वीच्या परिक्षेची तयारी केली आहे.

शासन निर्णयानुसार अशा विशेष विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परिक्षेसाठी लेखनिक घेण्याची मुभा असली तरी आतापर्यंत लेखनिक परिक्षार्थी विद्यार्थ्यांपेक्षा लेखनिक वयाने लहान राहिला आहे. मात्र विशेष विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारी २०१६ रोजी शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांपेक्षा प्रौढ लेखनिक घेवुन परिक्षा देण्याची मुभा मिळाली. आणि श्रुती लेखनिकेसह दहावी पास झाली. येत्या आठवड्यात होणाऱ्या बारावी परिक्षेसाठी श्रुती सज्ज झाली आहे. 

श्रीकांत व माधवी पंडीत यांची श्रुती ही त्यांची एकुलती एक मुलगी. आई माधवी खाजगी नोकरी करतात. तर वडील श्रीकांत पंडीत हे घर व्यवसाय सांभाळुन श्रुतीची पुर्णवेळ काळजी घेतात. 

श्रुतीला स्मार्ट फोन हाताळता येतो. तिला चित्रकलेचाही छंद आहे. श्रुती जन्मतच ५० टक्के सौम्य (मतिमंद) दिव्यांग आहे. परंतु, आपली मुलगी स्वता:च्या पायावर ईतरांप्रमाणे उभी राहावी यासाठी पंडीत दांपत्य परिश्रम घेत आहे. त्यांनी श्रुतीला बारावी पर्यंत शिकविले तरी पुढे काय? असा प्रश्न पंडीत दांपत्याला पडला आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला लेखनिकाची सुविधा मिळणार नाही. श्रुतीचीही शिकण्याची ईच्छा आहे. 

''पदवी पर्यंत अशा विद्यार्थ्यांना लेखनिकेसह परिक्षेची सवलत असायला हवी. श्रुती नक्कीच पुढचे शिक्षण पुर्ण करेल''.
माधवी पंडित

''माझा हा लेखनिक म्हणुन परिक्षा देण्याचा पहिलाच अनुभव आहे. श्रुतीला समजण्यासाठी मला आधी तिच्याशी मैत्री करावी लागली. अशी मुले खुप हळवी असतात. मात्र त्यांच्याशी त्यांच्यात मिळुन मिसळुन आईच्या ममतेप्रमाणे घ्यावे लागते. ती काय बोलते,कशी उत्तरे देते हे समजुन घेवुन तिच्याशी मैत्री करावी लागते''.
लेखनिक प्रियंका हांडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT