पुणे

कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून मिळणार लाभ 

सकाळवृत्तसेवा

पुणे - अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना शहरातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य विकत घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून (ता. 1) ही योजना शहरातील सर्व भागांत सुरू होणार आहे. 

शहर अन्नधान्य पुरवठा विभागामध्ये "आधार'वर आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) सुरू केली आहे. त्या माध्यमातून अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत शहरातील शिधापत्रिकाधारकांना कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य विकत घेता येणार आहे. 

शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकाने नेमून देण्यात आली आहेत. त्या दुकानांशिवाय इतर दुकानांमधून त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही. ही व्यवस्था बदलण्यासाठी आता "एईपीडीएस' ही अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यातून नागरिकांना कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळू शकणार आहे. 

प्रभारी अन्नधान्य पुरवठा अधिकारी आर. बी. पोटे म्हणाले, ""शहरातील पुरवठा विभागांच्या 11 पैकी दोन परिमंडळांमध्ये "एईपीडीएस' पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. त्याच्या यशानंतर हा प्रकल्प संपूर्ण शहरात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक मार्चपासून शहरातील उर्वरित नऊ परिमंडळांमध्येही या पद्धतीने स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना धान्य घेता येईल. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ही योजना आहे.'' 

राज्यात नागपूर, भंडारा, कोल्हापूर, नाशिक, जालना, सोलापूर, वर्धा, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचा वापर सुरू झाला आहे. आता पुणे शहरात याचा अवलंब होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांचा त्रास कमी होणार आहे, असेही पोटे यांनी सांगितले. 

शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात नागरिक स्थलांतरित होत असतात. शिधापत्रिकाधारकांच्या निवासाच्या पत्त्यात बदल केल्यानंतर नवीन ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानातून त्यांना धान्य मिळू शकते. ही व्यवस्था आता बदलण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

योजना ................... शिधापत्रिकाधारक .......... "आधार'शी जोडणी झालेले शिधापत्रिकाधारक 
अंत्योदय ................ 9918 ..................... 8476 
अन्नसुरक्षा ............... 3 लाख 35 हजार 313 .... दोन लाख 74 हजार 491 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : जयंत पाटील-फडणवीस खलबतानंतर लगेच शरद पवारांची एन्ट्री; मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Uruli Kanchan News : चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर दोन महिला जखमी

Maharashtra Live News : इम्पेरियल हाईट्समधील आगीवर ७ तासांनंतर नियंत्रण; २ महिलांचा होरपळून मृत्यू, कोट्यवधींचे नुकसान

Karad News : शेतकऱ्यांच्या पाच हजार मदतीवरून थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचा थेट सरकारला अल्टीमेटम

Loni Kalbhor Accident : भरधाव इलेक्ट्रिक कारची धडक; भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यु

SCROLL FOR NEXT