Sharad Pawar Raj Thackray 
पुणे

पवार साहेब, खरं बोलल्याचा कधी त्रास झाला आहे? : राज ठाकरे 

सकाळ डिजिटल टीम

पुणे : 'खरं बोलल्याचा तुम्हाला राजकारणात कधी त्रास झाला आहे का..' असा पहिलाच थेट प्रश्‍न आणि त्यावर त्या अनुभवी नेत्याने मारलेला षटकार.. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज ठाकरे यांनी घेतलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुलाखतीची सुरवातच दणक्‍यात झाली. 

शरद पवार यांच्या राजकीय प्रवासामधील विविध घटना, पवार यांच्या स्वभावाचे विविध पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी या मुलाखतीतून केला. 

'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत, असे विधान यशवंतराव चव्हाण यांनी केले होते' असा उल्लेख करून राज ठाकरे यांनी पवार यांना त्याविषयी प्रश्‍न विचारला. त्यावर पवार म्हणाले, "आम्ही एकदा हा प्रश्‍न त्यांना विचारला होता. त्यावर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, की विविध जाती-जमातींना आणि विखुरलेल्या समाजाला एकत्र ठेवण्यामध्ये पंडित नेहरु यांचे योगदान मोठे आहे. माझ्या दृष्टीने राष्ट्रासाठी दिलेले योगदान सर्वाधिक महत्त्वाचे आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा किंचितही अनादर नाही' असे त्यांनी सांगितले होते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: बालिंगा कचरा डेपोला आग; धुरामुळे ग्रामस्थ हैराण!

SCROLL FOR NEXT