marathi news sharadchandra dharurkar lifetime achievement  
पुणे

शरदचंद्र धारुरकर यांना जीवनगौरव पुरस्कारने गौरविणार

मिलिंद संधान

नवी सांगवी - पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत क्रीडा शिक्षक, क्रीडा पत्रकार आणि राष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित केले जाणार आहे.

मंगळवार (ता. ६) रोजी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या कै. मनोहर वाढावकर सभागृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे भूषविणार असून माजी ऑलंपिक खेळाडू व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली भागवत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी व उपसंचालक विजयराव संतान, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, शांताराम जाधव उपस्थित रहाणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष चांगदेव पिंगळे व सचिव अंगदराव गरड यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT