marathi news student made jcb machine  
पुणे

विद्यार्थ्याने बनविले टाकाऊ पासून जेसीबी यंत्र

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी - विद्यार्थ्यांमध्ये सुप्तगुण असतात. त्या गुणांना एक वैचारिक आणि बौद्धिक व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. दैनंदिन जीवनात आपण भरपूर वस्तू बिनकामी म्हणून फेकून देतो. पण त्याच उपयोगात आणून त्यापासून टिकाऊ वस्तू बनविता येतात. अशीच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ जेसीबी यंत्र रावेत येथील महानगरपालिकेच्या शाळेतील इ. ७ वी. मध्ये शिकणाऱ्या विक्रम छत्ररामजी सोलंकी या विद्यार्थ्याने बनविले आहे. 

विक्रमने टाकाऊ असणाऱ्या इंजेक्शन, सिरीन व लाकडी काड्या, कागदी पुठ्ठा वापरून जेसीबी हे यंत्र बनविले आहे. भविष्यात आपल्याला वीज, पाणी व इतर इंधनाची भरपूर आवश्यकता भासणार आहे व हि इंधने आपल्याला पुरणारी नाहीत, हाच विचार करून मी हे टाकाऊ वस्तू पासून बनविले आहे. या सर्व वस्तू वापरुन झाल्यानंतर वापरल्या आहेत, असे विक्रमने सांगितले. या त्याच्या कलाकृतीला बजाज ऑटोतर्फे आकुर्डी येथे भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात पहिल्या क्रमांकाबरोबरच विशेष लक्षवेधी पुरस्कारही मिळाला आहे. हे यंत्र बनविण्यासाठी त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका विसपुते प्रतीक्षा, शोभा खटाटे, छाया गायकवाड, सुनिता म्हसे, रुपाली कड, हेमंत साठे, गीता खोपे, चारुशीला जाधव, निशा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 

आम्ही विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यात प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते, आणि ते आम्ही देण्याचे काम करतो. विद्यार्थी त्यात सहभागी असतात. या अशा नवनवीन प्रयोगामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, एखादी विद्यार्थ्यांची कल्पना व्यावहारिक जीवनात उपयोगी पण येणाऱ्या असतात, असे शाळेच्या मुख्याध्यापिका विसपुते प्रतीक्षा यांनी मत व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ८० हजार मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या घरची आर्थिक परस्थिती बेताचीच असते, त्यामुळे शिक्षणापासून वाड्या वस्त्यांवरची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे राज्य सरकार चा निर्णय किती बरोबर आहे हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT