पुणे

तालेरा रुग्णालय होणार मल्टिस्पेशालिटी 

दीपेश सुराणा

पिंपरी  - चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची 37 वर्षे जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारली जाणार आहे. 39 कोटी 77 लाख रुपये खर्च करून रुग्णालयाचे रूप पालटणार आहे. नवीन पाच मजली इमारतीमध्ये महापालिकेतर्फे नागरिकांसाठी मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. 

सद्य-स्थिती व भविष्यातील नियोजन 
* इमारत 37 वर्षे जुनी 
* जागा कमी पडत असल्याने शेजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय इमारत उभारणी 
* सावित्रीबाई फुले रुग्णालय इमारतीचे 20 जून 2015 रोजी उद्‌घाटन 
* जुनी इमारत खिळखिळी व वापरण्यास अयोग्य झाल्याने स्ट्रक्‍चरल ऑडिटचा निर्णय 
* जुनी इमारत पाडून नव्याने होणार बांधकाम; नवीन इमारतीत मिळणार मल्टिस्पेशालिटी सुविधा 
* जुन्या इमारतीतील सर्व विभागांचे सध्या सावित्रीबाई फुले रुग्णालय इमारतीत स्थलांतर 

दृष्टिक्षेपात रुग्णालय 
* जागा - 7379 चौरस मीटर 
* बांधकाम - 6232.15 चौरस मीटर 
* खाटा - 158 
* नियोजन - पार्किंगसह पाच मजली इमारत 
* रुग्णालय इमारत उभारणीच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी 
* ठेकेदारासोबत कराराची प्रक्रिया सुरू 
* प्रत्यक्ष काम 15 दिवसांत सुरू होणे अपेक्षित 
* इमारत उभारणीसाठी अपेक्षित खर्च 39 कोटी 77 लाख 
* इमारत उभारणीसाठी अपेक्षित कालावधी 30 महिने 

भविष्यातील सुविधा 
* पहिला मजला - 10 बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, एक्‍स-रे रूम, चोवीस तास मेडिकल सुविधा 
* दुसरा मजला - बाह्यरुग्ण विभागांतर्गत 6 तपासणी कक्ष, रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी लॅब), सीटी स्कॅन, सोनोग्राफी, फिजिओथेरपी 
* तिसरा मजला - शस्त्रक्रिया विभाग (मॉड्युलर), डायलिसिस विभाग, अतिदक्षता विभाग 
* चौथा मजला - मेडिकल वॉर्ड - 40 खाटा, शल्यक्रिया (सर्जिकल) वॉर्ड - 40 खाटा, डे केअर वॉर्ड 
* पाचवा मजला - अस्थिरोग उपचार वॉर्ड - 20 खाटा, नेत्ररोग वॉर्ड - 8 खाटा, नाक- कान- घसा वॉर्ड - 8 खाटा, प्रशासन विभाग 

लाभ 
* चिंचवड परिसरातील नागरिकांना घराजवळच मिळणार वैद्यकीय सुविधा 
* यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील (वायसीएम) ताण कमी होणार 

तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन उभारणार आहोत. त्यामध्ये पोस्टमार्टेम सेंटर वगळता सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील. नियोजित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामुळे चिंचवड परिसरातील नागरिकांची सोय होईल. 
- डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

तालेरा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले आहे. त्यात संबंधित इमारत पाडून नवीन उभारणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार इमारत उभारणीसाठी आवश्‍यक खर्चाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. ठेकेदाराशी करारनामा करून पुढील पंधरा दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. 
- देवन्ना गट्टूवार, कार्यकारी अभियंता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील १३ गावांचा संपर्क तुटला... मुसळधार पावसाचा परिणाम, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

Pune-Bengaluru Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील उडतरे उड्डाणपुलावरचा रस्ता गेला वाहून; कोट्यवधींच्या कामाची पावसाने केली पोलखोल, वाहनधारकांकडून तीव्र संताप

Latest Marathi News Update: कळमोडी धरण १०० टक्के भरलं, विसर्गामुळे चासकमानच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ

FIFA WORLD CUP: वर्ल्डकप स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप; अमेरिकेचा हुकमी खेळाडू बालोगुनचे ‘रेड कार्ड’ फिफाकडून तात्पुरते रद्द

IND vs ENG: वेगवान गोलंदाजाचा समावेश निश्चित; बिश्नोईला डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-इंग्लंड आज लढत

SCROLL FOR NEXT