marathi news treachers help to student for brain operation
marathi news treachers help to student for brain operation  
पुणे

मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी शिक्षिकेची विद्यार्थ्याला आर्थिक मदत

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन - राष्ट्राची प्रगती तेथील गुरुजनांवर अवलंबून असते. या वाक्याला साजेसा पराक्रम तळेगावातील पैसा फंड शाळेच्या शिक्षिका ज्योती भेगडे यांनी केला आहे. मणका आणि मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुप आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करुन निधी जमवत सदर शिक्षिकेने हलाखीच्या आर्थिक परीस्थितीत शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या एका शाळेतील विद्यार्थ्याला जीवदान दिले.

गुरु शिक्षकांमधील नात्याची संवेदनशीलता हरवत चालल्याची भ्रांत सध्याच्या आधुनिक जगात पाहायला मिळत असली तरी तळेगाव दाभाडे सारख्या निमशहरी भागात ज्ञानदानाबरोबरच समाजसेवेचा वसा जपणारे शिक्षकही पाहावयास मिळतील. तळेगावात स्वातंत्र्यपूर्व काळात आर्थिक दुर्बल कामगारांच्या पाल्यांना मोफत शिक्षणासाठी स्थापन झालेल्या पैसा फंड प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडून, समाजसेवेचे व्रत आजमितीसही अविरतपणे जपले जात आहे. तळेगावातील पु. वा. परांजपे विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम अनिल मोरे या विद्यार्थ्याला मानेचे हाड वाढल्यामुळे मेंदूवर ताण येऊन चक्कर येण्याचे प्रमाण वाढले होते. मेंदूचा रक्तपुरवठा थांबून जीवावर देखील बेतण्याची शक्यता होती. त्यासाठी तज्ञांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यासाठी लागणारा दोन लाखांचा खर्चाचा आकडा ऐकून मोलमजुरी करुन चरितार्थ चालवणाऱ्या ओमच्या आईवडिलांच्या पोटात गोळा आला. मात्र ओमच्या आई सुनीता मोरे यांनी न डगमगता आपल्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी समाजासमोर पदर पसरला असता, पैसा फंड शाळेच्या शिक्षिका ज्योती भेगडे यांनी पुढाकार घेतला. समाजकार्यात सदा अग्रेसर आणि आदर्श ठरलेल्या परिसरातील "जागरुक वाचक कट्टा तळेगाव" या व्हॉट्सअॅप ग्रुपवर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आवाहन केल्यानंतर, यासाठी अनेकांनी स्वेच्छेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

उद्योजक किरण काकडे, रोटरी क्लबचे विलास काळोखे, संतोष खांडगे, पैसा फंड प्रार्थमिक शाळेचा शिक्षक वृंद, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नलावडे, सुरेश शिंदे, राजू कडलक, संजय चव्हाण, दिलीप डोळस आणि सहकार्यांच्या योगदानातून ३२ हजार रुपये आणि मुलाच्या आईकडचे मिळून एक लाख सुपूर्द करण्यात आले. ग्रुपवरच्या आवाहनाला प्रतिसाद देत तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि स्पर्श हॉस्पिटल व्यवस्थापनाने उर्वरित खर्च उचलण्याची हमी दिली. गेल्या एक जानेवारीला सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये ओमच्या मेंदू आणि मणक्यावरील अवघड शस्त्रक्रिया यशश्वीरित्या पार पडली पडली. आपल्या पोरासाठीच्या मदतीमुळे टळल्याने आई सुनीता मोरे यांना भावना अनावर झाल्या. सदर समाजशील उपक्रमाचा कृतज्ञता समारंभ सोमवारी (ता. ०८) सकाळी स्पर्श हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला होता. एक प्रकारे पुनर्जन्मच झालेल्या ओमच्या भावी आरोग्यमय आयुष्यासाठी सर्वांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, पुणे जिल्हा किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, रघुवीर शेलार, जागरुक वाचक कट्टा व्हॉट्सअँप ग्रुपचे सदस्या ज्योती भेगडे, संजय चव्हाण, दिलीप डोळस, अनिल धर्माधिकारी स्पर्श हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. अमित वाघ, डॉ. राहुल बढे, डॉ. रुचा वाघ, डॉ. कुडे, नितीन कुडे यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT