पुणे

अंबवडेत मराठी राजभाषा दिन उत्साहात

CD

मराठी राजभाषा दिन
अंबवडेत उत्साहात

मायणी, ता. १ : अंबवडे (ता. खटाव) येथील भुतेश्वर विद्यामंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती आणि जागतिक मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्‍यास चांगला प्रतिसाद लाभला.
मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख दुनेश सोनवलकर आणि मराठी विभाग प्रमुख हेमलता शिंदे यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा केली होती. त्यांनी व्यक्तिगत व समुदायाने कविता वाचन व गायन केले. बालकलाकारांनी धनगरी ओव्यांचे ढोलाच्या तालावर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून माय मराठी व मातृभाषेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख व्याख्याता हेमलता शिंदे यांनी मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे असल्याचे यांनी सांगितले. दुनेश सोनवलकर, एस. बी. देशमुख या शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमात रंग भरला. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख व्याख्याता हेमलता शिंदे यांनी कुसुमाग्रज यांची साहित्यिक जडणघडण आणि त्यांचे जीवनचरित्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी संदीप त्रिंबके, विजयकुमार जाधव, रवींद्र पारधी, अर्चना माने, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

फाेटाे :...........03255
अंबवडे : धनगरी ओव्या सादर करताना विद्यार्थी.
........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT