Drama sakal
पुणे

Pune : मराठी राज्य नाट्य स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ वेळापत्रक जाहीर

पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीला मंगळवारपासून प्रारंभ होईल. १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत ही फेरी पार पडेल.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत एकूण २२ संघांचे सादरीकरण होणार आहे. मंगळवारी योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्थेच्या ‘बावळेवाडी’ या नाटकाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक संस्थेच्या ‘शेवटी जगणं महत्त्वाचं’ या नाटकाने स्पर्धेचा समारोप होईल. सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे ही फेरी पार पडणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता प्रत्येकी एका नाटकाचे सादरीकरण होईल. मात्र, २७ नोव्हेंबर रोजी नाट्यगृह उपलब्ध नसल्याने कोणत्याही नाटकाचे सादरीकरण होणार नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० व २०२१ अशी सलग दोन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ६० वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली होती. कोरोनामुळे अनिश्चतेचे मळभ असलेल्या या स्पर्धेत अवघ्या चौदा संघांनी भाग घेतला होता. यंदा मात्र निर्बंधमुक्त वातावरण असून शिरस्त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात स्पर्धा पार पडते आहे. त्यामुळे सहभागी संघांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मागील स्पर्धेत चौदाच संघ सहभागी असल्याने नियमाप्रमाणे अंतिम फेरीसाठी पुणे केंद्रावरून एकाच संघाची निवड झाली होती. परंतु, यंदा सहभागी झालेल्या संघांपैकी किमान पंधरा संघांचे सादरीकरण झाल्यास पुणे केंद्रावरून दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.

‘‘यावर्षी पुणे केंद्रावर नवीन संहिता पाहायला मिळत आहेत, तसेच अनेक नवीन संस्था देखील सहभागी झाल्या आहेत. हौशी नाट्यकर्मी राज्य नाट्य स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व समृद्ध नाट्यानुभव घेण्याकरिता रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी.’’

राहुल लामखडे, स्पर्धा समन्वयक - पुणे केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT