पुणे

चार लाख देऊनही विवाहितेचा मानपानावरून छळ

CD

चार लाख देऊनही विवाहितेचा
सासरी मानपानावरून छळ
सोलापूर : लग्नानंतर दोन वर्षांनी सासरच्यांनी विवाहात मानपान केला नाही म्हणून छळ सुरू केला. घर बांधायला म्हणून माहेरहून चार लाख रुपये आणून दिले. तरीदेखील, सासरच्यांनी आणखी एक लाख रुपये आण म्हणून मानसिक, शारीरिक त्रास दिला. पती शंकर पेद्दुर (रा. शास्त्री नगर, सोलापूर) याने चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार घराबाहेर जा म्हणून शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याची फिर्याद रोहिणी पेद्दुर (वय ३५, रा. शास्त्री नगर) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. एप्रिल २०२४ पासून त्यांनी छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यावरून विवाहितेचा पती शंकर पेद्दुर, सासू नागम्मा पेद्दुर, नणंद देवकी व राजेश्री यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार इनामदार तपास करीत आहेत.
------------------
अल्पवयीन मुलीला
फूस लावून पळवले
सोलापूर : अक्कलकोट रोडवरील किसान नगरातील साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ३ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली. त्या दिवशी सकाळी १० ते दुपारी दोनच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा घरी आलीच नाही. तिच्याकडील मोबाईल बंद लागत होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यानंतर चिंतेतील तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली. अल्पवयीन मुलीला कोणीतरी कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT