sheetal1.jpeg
sheetal1.jpeg 
पुणे

पुणे रनिंग स्पोर्टसतर्फे  बालेवाडीत मॅरेथॉन 

सकाळ वृत्तसेवा


पुणे ः येथील रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुणे रनिंग स्पोर्टस फाउंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता. 
जास्तीत जास्त नागरिकांमध्ये व्यायामाविषयी जागृती निर्माण होऊन धावपळीच्या जीवनात व्यायाम हा एक दैनंदिनी बनविणे या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी पाचपासून साडेसात वाजेपर्यंत तीन, पाच व सात किलोमीटरच्या अंतरासाठी ही मॅरेथॉन घेण्यात आली. सामाजिक स्तरावर वर्षभर फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शहरातील विविध भागांत महिन्याच्या शेवटच्या रविवारी अशा प्रकारच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. फाउंडेशनचे शहरात एकूण चोवीस केंद्र असून, नागरिकांना तंदुरुस्त राहण्यासाठी वेगवेगळे व्यायाम येथे घेतले जातात. या सर्व सेवा फाउंडेशनचे सभासद विनामूल्य देत असतात. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनचे राकेश मेहता, संदीप कोल्हटकर, प्रीती आरवाडे, सुधींद्र हरिभट, महेश नारकर, निखिल शहा आदींचे मोलाचे योगदान लाभले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT