satarta marathone  sakal
पुणे

Marathon News : सातारा हिल मॅरेथॉनमध्ये दरवर्षी बारामतीकरांचा वाढतोय सहभाग...

आंतरराष्ट्रीय सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये रविवारी (ता. 3) 250 हून अधिक बारामतीकरांनी सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

मिलिंद संगई, बारामती

बारामती - येथील विविध संस्था व संघटना यांच्या सदस्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेत सहभाग नोंदविला. दोन, अडीच व अडीच तासाहून अधिक अशा तीन प्रकारात होणारी मॅरेथॉन काही सदस्यांनी दोन तासांहूनही कमी वेळेत पूर्ण केली. अत्यंत नावाजलेल्या व आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते.

बारामतीकरही या स्पर्धेसाठी अनेक दिवस तयारी करतात. यात महिलांसह विविध घटकातील मान्यवरांचाही समावेश आहे. यंदा तीसहून अधिक बारामतीकर महिला उत्साहाने या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.

दरवर्षी कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान स्विकारुन उत्साही बारामतीकर या स्पर्धेत सहभागी होत असतात. दरवर्षी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणा-या बारामतीकरांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. फिटनेसप्रती जागरुकता निर्माण होत असल्याने व विविध ग्रुप दैनंदिन सकाळी फिटनेससाठी एकत्र येत असल्याने ही संख्या वाढू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT