पुणे

ढेबेवाडी मराठवाडीच्या लाभक्षेत्राला मोठा दिलासा

CD

‘मराठवाडी’मुळे गहू, बागायती पिकांना जीवदान

धरणातून पाणी सोडल्याने लाभक्षेत्राला दिलासा; शेतकऱ्यांत समाधान

ढेबेवाडी, ता. ८ : कडक उन्हामुळे रब्बीसह बागायती पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. वांग नदीत पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने मराठवाडी धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. ऐन गरजेवेळी धरणातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नदीकाठी नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या गावांनाही त्याचा फायदा होणार आहे.

मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात कऱ्हाड व पाटण तालुक्यातील वांग नदीकाठच्या अनेक गावांचा समावेश आहे. नदीवरील दहा बंधाऱ्यांत धरणांतून सोडलेले पाणी अडविले जाते. गेल्या २८ वर्षांत मराठवाडी धरणात अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात यश आलेले नाही. पुनर्वसनाचे काही शिल्लक प्रश्न आणि पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्यावर निर्माण होणारा दळणवळणांचा प्रश्न ही कारणे त्यामागे होती. यंदाच्या पावसाळ्यात मात्र धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवले जाईल, अशी चिन्हे आहेत.
सध्या पावसाळ्यापर्यंत लाभक्षेत्राला पुरून उरेल एवढा पाणीसाठा मराठवाडी धरणात शिल्लक आहे. दहापैकी काही बंधाऱ्यांना गळती आहे. मध्यंतरी धरणातून सोडलेले पाणी संपून बंधारे मोकळे पडल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातून पुन्हा पाणी सोडायला सुरुवात झाली. कडक उन्हामुळे परिसरात रब्बीतील गहू आणि भाजीपाल्यासह ऊस तसेच उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणच्या रब्बी ज्वारीच्या पिकाला पाण्याची गरज आहे. ऐन गरजेवेळी धरणातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नदीकाठी नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या गावांनाही त्याचा फायदा होणार आहे.
---------
कोट
..........

मराठवाडी धरणातून पाणी सोडल्याने वांग नदीची पाणी पातळी वाढणार आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून नदीपात्रातून ये-जा करू नये.

- हर्षवर्धन भोसले,
सहाय्यक कार्यकारी, अभियंता पाटबंधारे विभाग


B08179
मराठवाडी : सिंचनासाठी मागणी वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

Ishan Kishan Girlfriend: ऑरेंज टँक टॉप, साधी जीन्स; वर्ल्ड कप विजयानंतर ईशान किशनसोबत दिसलेली गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आहे तरी कोण? Video Viral

SCROLL FOR NEXT