पुणे

मराठवाडा-विश्‍लेषण

CD

मराठवाडा: विश्‍लेषण
‘वन्देभाजप एक्स्प्रेस’ जोरात!
संतोष शाळिग्राम
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील पाच महापालिका निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरते मर्यादित नाहीत, राज्याच्या राजकारणातील बदलती दिशा या निकालांनी स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना आणि परभणी येथील निकालांनी राजकीय पक्षांच्या ताकदीची नवी मांडणी लोकांसमोर ठेवली आहे. परभणी वगळता चार जिल्ह्यांमध्ये शिवसेना (युबीटी) पक्षाच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याचे चित्र आहे, तर भाजपने तीन जिल्ह्यांवर त्यांची पकड सिद्ध केली आहे.

संभाजीनगरात निर्विवाद भाजप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे नेते, मंत्री अतुल सावे, भागवत कराड, शिरीष बोराळकर आणि अन्य नेत्यांनी कस लावला. त्यातून भाजपला ५८ जागा मिळविता आल्या. भाजप निर्विवाद बहुमताजवळ पोचले आहे. ‘एमआयएम’ने आपली ताकद दाखवून दिली असून, जवळपास ३० जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेना (युबीटी) पक्ष इथे नामशेष झाल्याचे चित्र आहे. यावेळी किरकोळ सहा जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील वादामुळे या पक्षावर नामुष्कीची वेळ आली. शिवसेनेतही राजकीय बंडाळी माजली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दोन मुलांच्या प्रचाराकडे लक्ष दिले. त्यामुळे शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली नाही.
नांदेडमध्ये चव्हाण समीकरण
नांदेड जिल्हा म्हणजे अशोक चव्हाण या समीकरणावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. पूर्वी चव्हाण यांचे नेतृत्व हे काँग्रेसची राजकीय ताकद होती. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील समीकरणे बदलली. त्याचे प्रतिबिंब या निकालांमध्ये उमटले. या निवडणुकीत भाजप ४५ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपचा महापौर होण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनेला मर्यादित यश मिळाले असले, तरी अंतर्गत मतभेदांचा फटका पक्षाला बसल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून काही प्रमाणात दिलासा मिळवला, तरी पूर्वीचा दबदबा पुन्हा मिळवण्यात अपयश आले आहे.
लातुरात पुन्हा काँग्रेसच
नांदेडच्या उलट चित्र लातूरमध्ये पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरून उभा राहिलेला भावनिक मुद्दा, स्थानिक पातळीवरील संघटन आणि माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व यामुळे काँग्रेसने ७० पैकी ४३ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. वंचित बहुजन आघाडीची साथही काँग्रेससाठी निर्णायक ठरली. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि २२ जागांवर समाधान मानावे लागले.
जालन्यात भाजपची एकहाती सत्ता
जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्यापाऱ्यांशी संवाद आणि माजी आमदार कैलास गोरंट्य़ाल यांचा भाजप प्रवेश, तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. हेच निर्विवाद बहुमत देणाऱ्या विजयाचे महत्त्वाचे घटक ठरले. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षालाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत महापालिकेचा कारभार चालवता येईल, हा व्यापारी वर्गाचा कौल भाजपच्या पारड्यात गेला. शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील पक्षांना देखील अपेक्षित यश मिळवता आले नाही. ‘एमआयएम’ने मात्र दोन जागा जिंकत महापालिकेत प्रवेश केला आहे.

परभणीत भाजपला मात
--
परभणीत शिवसेना (युबीटी) पक्ष आणि काँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना (युबीटी) २५ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी उमेदवार देताना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले. शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी मुस्लिम मतदारांची निर्णायक भूमिका ओळखून आखलेली रणनीती यशस्वी ठरली. ६५ पैकी ३७ जागांसह सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. एकूणच मराठवाड्यातील या निकालांनी राजकीय समीकरणांचा वेगळा संदेश दिला आहे. अंतिम सत्ता-समीकरणे जरी वेगवेगळी असली, तरी भाजपने हा प्रदेश काबिज करण्यास सुरवात केल्याचे संकेत या महापालिका निवडणुकांतून मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT