पुणे

मार्चचीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबरमध्ये  

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सीच्या (तृतीय वर्ष) भौतिकशास्त्र विषयासाठी मार्च २०१८चीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबर २०१८ मध्ये दिली. दोन्ही प्रश्‍नपत्रिकेतील सर्व प्रश्‍न एकच आहेत. 

पुणे विद्यापीठातील प्रत्येक सेमिस्टरसाठी (मार्च आणि ऑक्‍टोबर) स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका काढण्यात येते. भौतिकशास्त्र विभागाच्या मॅथॅमॅटिकल मेथड इन फिजिक्‍स (पॅटर्न २०१३) या विषयाची मार्चमध्ये काढलेली प्रश्‍नपत्रिकाच गेल्या शनिवारी (ता. २०) पुन्हा विद्यार्थ्यांना  देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. ही प्रश्‍नपत्रिका ४० गुणांची आहे. 

प्रश्‍नपत्रिका हातात पडल्यावर काही प्राध्यापकांना शंका आली. त्यांनी खात्री केली. त्यावर ऑक्‍टोबरची तारीख पाहून, त्यांनी परीक्षार्थींना प्रश्‍नपत्रिका वाटली. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी जुन्या प्रश्‍नपत्रिका सोडविलेल्या असतात. त्यांना ही जुनीच प्रश्‍नपत्रिका असल्याचे लक्षात आले. त्यांनी ती बाब प्राध्यापकांच्या लक्षात आणून दिली. 

यासंदर्भात नाव न छापण्याच्या अटीवर संबंधित प्राध्यापकांनी सांगितले, की दोन्ही सेमिस्टरसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्यात आली. त्यामध्ये प्रश्‍न व उदाहरणांचाही फरक नाही. 

मार्च व ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या परीक्षांची प्रश्‍नपत्रिका एकच असल्याची कोणतीही तक्रार विद्यापीठाकडे आलेली नाही. त्याबाबत आम्ही आता कोणतेही भाष्य करू शकत नाही.
 -डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा विभाग प्रमुख,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT