पुणे

(कै.) सदाशिवराव पोळ यांच्या सुनांच्यात रंगणार प्रतिष्ठेची लढत

CD

‘जावा- जावा’च्या संघर्षात मार्डीचा फैसला

पोळ कुटुंबातील दोन वारस आमने- सामने; देशमुखांचीही प्रतिष्ठा पणाला

रूपेश कदम : सकाळ वृत्तसेवा
दहिवडी, ता. २३ : माण तालुक्यातील मार्डी गटात किंगमेकर (कै.) सदाशिवराव पोळ ऊर्फ तात्या यांच्या दोन सुनांच्यात प्रतिष्ठेची लढत होणार असून, अतिशय रंगतदार परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे पोळ कुटुंबांतर्गत होत असलेल्या जावा -जावांच्या उभ्या दाव्याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागले आहे. इथे कमळ फुलणार की घड्याळाचा गजर होणार याची उत्सुकता वाढू लागली आहे.
पोळ कुटुंबीयांचे ‘घरचे मैदान’ म्हणून मार्डी जिल्हा परिषद गटाची ओळख आहे. पुन्हा एकदा मार्डी गट जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. कधीकाळी किगमेकर (कै.) सदाशिवराव पोळ अर्थात माण तालुक्याचे लाडके नेते तात्या यांचा मार्डी गटासह माण तालुक्यावर एकछत्री अंमल होता. तात्यांच्या पश्चात सुरुवातीला शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले. आता प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत अखंड राष्ट्रवादीकडून लढून तात्यांच्या दोन्ही सुना डॉ. भारती संदीप पोळ व सोनाली मनोजकुमार पोळ या दोघी अनुक्रमे गोंदवले बुद्रुक व मार्डी गटातून विजयी होऊन जिल्हा परिषदेत पोहोचल्या. मात्र त्यानंतर पोळ कुटुंबात ठिणगी पडली व डॉ. संदीप पोळ यांनी जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाट धरली, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मनोजकुमार पोळ यांनी अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले.
मार्डी गटात भाजपकडून डॉ. भारती संदीप पोळ यांची, तर राष्ट्रवादीकडून सोनाली मनोजकुमार पोळ यांची उमेदवारी अंतिम झाली आहे. मार्डी गणात भाजपकडून इच्छुकांची मांदियाळीत भाजपने धक्कातंत्र वापरत संभूखेडच्या सुचिता विलासराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे, तर वरकुटे म्हसवड गणात सुद्धा भाजपने अनपेक्षितपणे रांजणीच्या माया नानासाहेब दोलताडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून मार्डी गणात राणंदच्या प्रियांका भुजंगराव जगदाळे व वरकुटे म्हसवड गणात कल्पना जनार्दन वीरकर हे तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मार्डी गटात राजकीय पक्षांपेक्षा पोळ भावाभावांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. डॉ. संदीप पोळ व मनोज पोळ हे काय रणनीती आखतात व त्यांना गणातील उमेदवार, तसेच कार्यकर्त्यांची कशी साथ मिळते हे पाहावे लागणार आहे. मागील निवडणुकीत अखंड राष्ट्रवादी व रासपमध्ये आघाडी होऊन त्यांनी हा गट व दोन्ही गण जिंकले होते. आता सुद्धा राष्ट्रवादी एकत्र आली असून, रासप सुद्धा सोबत आहे. प्रभाकर देशमुख व मनोजकुमार पोळ यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने मार्डी गट अतिशय महत्त्वाचा आहे.
मार्डी गटात डॉ. भारती संदीप पोळ (भाजप), सोनाली मनोजकुमार पोळ (राष्ट्रवादी), सुचिता विलासराव देशमुख (अपक्ष), प्रियांका भुजंगराव जगदाळे (अपक्ष), मार्डी गणात सुचिता विलासराव देशमुख (भाजप), प्रियांका भुजंगराव जगदाळे (राष्ट्रवादी), रूपाली गणेश कापसे (अपक्ष), सोनाली मनोजकुमार पोळ (अपक्ष), अलका संभाजी कदम (अपक्ष), सायली रणजित शिंदे (अपक्ष), म्हसवड गणात मायाक्का नानासाहेब दोलताडे (भाजप), कल्पना जनार्दन वीरकर (राष्ट्रवादी), यामिनी आप्पासो घुटुकडे (अपक्ष), पल्लवी नानासाहेब दोलताडे (अपक्ष), गंगूबाई कालिदास दोलताडे (अपक्ष) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मार्डी गटातील निवडणूक ही विकासकामांसह वैयक्तिक संपर्क, तसेच भावनिक मुद्दा यावर होण्याची चिन्हे आहेत.

..........

चौकट :
शिलेदारांचे मत कोणाच्या पारड्यात...
मार्डी गटात (कै.) सदाशिवराव पोळ ऊर्फ तात्या यांना मानणारा, तात्यांचे उपकार असणारा मतदार गावागावांत नव्हे तर घराघरांत आहे. त्यामुळे तात्यांच्या शिलेदारांचे व तात्यांना मानणाऱ्या मतदारांचे मत कोणत्या मुलाच्या बाजूने व कोणत्या सुनेच्या पारड्यात पडणार यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
.........

......................
छायाचित्र

(कै.) सदाशिवराव पोळ
MLV26B07196
सोनाली पोळ
MLV26B07197
डॉ. भारती पोळ
MLV26B07198
डॉ. संदीप पोळ व मनोजकुमार पोळ
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT