उत्रौली, ता. १० : पावसाने ओढ दिल्याने भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिके संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत खानापूर (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी दशरथ सुरेश थोपटे यांना झेंडूच्या शेतीतून समाधानकारक उत्पादन मिळत आहे. त्यामुळे थोपटे कुटुंबाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. त्यांची सोयाबीनची शेती पाण्याअभावी वाया गेली. त्यामुळे सोयाबीनने मारले, झेंडूने तारले अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
थोपटे यांनी जुलै महिन्यात पाऊस झाल्यावर खरीप हंगामातील सोयाबीनची पेरणी केली होती. गणेशोत्सवापासून पाऊस न पडल्याने हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक वाया गेले. मात्र, जुलै महिन्यात दीड एकर क्षेत्रात विजय व विठ्ठल जातीच्या दहा हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली होती.
दसरा, दिवाळीत चांगल्या भावाची अपेक्षा
गणेशोत्सव काळात मुंबई फुलबाजारात चांगली मागणी होती. फुलांचे व्यापारी बांधावर फुले खरेदी करून स्वतः वाहनाने घेऊन जात होते तसेच स्थानिक भाविकांकडून शेताच्या बांधावरून फुले खरेदी केली जात होती. या कालावधीत ४० हजार रुपयांची फुलांची विक्री झाली. पुढील दसरा, दिवाळी सणांत चांगला बाजारभाव मिळून चांगले उत्पन्न मिळण्याची दशरथ थोपटे यांना अपेक्षा आहे.
सेंद्रिय खताचा वापर करून फूलशेती केली आहे. गणेशोत्सव दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना मागणी असते. उन्हाळ्यात, लग्नसराईत इतर फुले दुर्मीळ असताना झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. ही फुले अनेक प्रकारची, विविध रंगांची व आकाराची असतात. या झेंडूचा गोंडा आकर्षक असल्याने फुलांना प्रतिकिलो सुमारे ५० रुपये बाजारभाव मिळतो.
- दशरथ थोपटे, प्रगतिशील शेतकरी, खानापूर (ता. भोर)
दृष्टिक्षेपात खर्च
- उत्पादन खर्च...... ३५ हजार
- गणेशोत्सव विक्री...... ४० हजार
- नवरात्रातील अपेक्षित विक्री.........९० हजार
- दिवाळीतील अपेक्षित विक्री...... ९० हजार
- अपेक्षित नफा...... १ लाख ८५ हजार
00967
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.