SLC26B30271
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल विभागात रविवारी रात्री आठ वाजता झालेली झेंडूची आवक.
बाजार समितीत झेंडू ५० रुपये, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो
दुष्काळी पार्श्वभूमीवर तेजीची अपेक्षा फोल
सकाळ वृत्तसेवा
उत्तर सोलापूर, ता. १८ : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झेंडूच्या फुलांची आवक सुरू झाली आहे. आवक वाढल्यामुळे बाजार समितीत झेंडूचे दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांदरम्यान आहेत. तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर दरात सुधारणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
या वर्षी अत्यल्प पावसामुळे झेंडूची पिके टिकून आहेत. दरवर्षी पावसामुळे झेंडूच्या फुलांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे झेंडूची लागवड मर्यादित राहिली आहे. त्यामुळे बाजारातील आवक सामान्य आहे. दुष्काळामुळे उत्पादन घटेल आणि झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या दरांमुळे ही अपेक्षा फोल ठरली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजार आवारात गेल्या चार दिवसांपासून झेंडूच्या फुलांची मोठी आवक होत आहे. सध्या झेंडूचे उत्पादन खर्चिक बनले आहे. एका रोपाची किंमत जवळपास तीन रुपयांपर्यंत आहे. लागवड, खते आणि रोगनियंत्रणावरही मोठा खर्च होतो. त्यामुळे फुलांना चांगला दर मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या हातात काही रक्कम शिल्लक राहते. सध्याच्या दरात खर्च आणि उत्पन्नाची तोंडमिळवणी करणेही कठीण होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कोट
-दुष्काळामुळे पाण्याची कमतरता आहे. उपलब्ध पाण्यावर झेंडूचे पीक घेतले. मात्र, त्याला अपेक्षित दर मिळाला नाही. सध्या मिळत असलेल्या दरातून उत्पादनाचा खर्च तरी निघेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
- महादेव भोसले, झेंडू उत्पादक शेतकरी, कोंडी, उत्तर सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.