मार्केट यार्ड - तत्कालिन पणन संचालकांच्या डिसेंबर २०१४च्या परिपत्रकाला स्थगिती दिल्याचे पत्र बाबा आढाव यांना देण्यात आले. त्यावेळी डावीकडून  बी. जे. देशमुख, डॉ. बाबा आढाव, चंद्रकांत टिकोळे, हनुमंत बहिरट, नितीन पवार, सुभाष वारे, राजेंद्र चोरगे, किशोर भानुस
मार्केट यार्ड - तत्कालिन पणन संचालकांच्या डिसेंबर २०१४च्या परिपत्रकाला स्थगिती दिल्याचे पत्र बाबा आढाव यांना देण्यात आले. त्यावेळी डावीकडून  बी. जे. देशमुख, डॉ. बाबा आढाव, चंद्रकांत टिकोळे, हनुमंत बहिरट, नितीन पवार, सुभाष वारे, राजेंद्र चोरगे, किशोर भानुस 
पुणे

बाजार समित्यांमध्ये पुन्हा तोलाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील बाजार समितीत पॅकिंग स्वरूपात येणाऱ्या मालावर तोलणारांची गरज नसल्याचा डिसेंबर २०१४ मध्ये तत्कालीन पणन संचालकांनी काढलेल्या आदेशाला विद्यमान पणन संचालकांनी स्थगिती दिली आहे, त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांत पुन्हा तोलाई सुरू होणार आहे. 

डिसेंबर २०१४ मध्ये काढलेला आदेश रद्द करून तोलणारांना पुन्हा कामावर घ्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव हे बुधवारपासून उपोषणाला बसले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, प्रशासक, सभापती, सचिव यांना स्थगितीबाबत एका परिपत्रकाद्वारे कळवले आहे. त्यामुळे आढाव यांच्या उपोषणाला यश आले आहे. 

आढाव यांना पणन उपसंचालक चंद्रकांत टिकोळे, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी नारळाचे पाणी देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. बाजार समितीचे उपसचिव सतीश कोंडे, महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट, कामगार युनियनचे संतोष नांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काय आहे परिपत्रक?
तोष्णीवाल यांनी परिपत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न अधिनियम व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदींमधील सुधारणा लक्षात घेऊन बाजार समित्यांतील सध्या शेतीमालाचे वजन करण्याच्या पद्धती, यंत्रणा, अद्ययावत साधने आणि उच्च न्यायालयाने दिलेले आदेश लक्षात घ्यावे. डिसेंबर २०१४ मधील सूचनांचा फेरविचार करावा. तसेच, त्यामध्ये कायदा व नियमाबाबत कोणत्या सूचना करणे आवश्‍यक आहे, त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे, त्यानुसार कार्यवाही होईल. राज्यातील बाजार समित्यांनी डिसेंबर २०१४ रोजीच्या परिपत्रकाअन्वये निर्गमित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी थांबवावी.

पणन संचालकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी बाजार समिती उद्यापासून (ता. २०) तत्काळ करेल. त्यानुसार बाजारातील सर्वांना सूचना देण्यात येतील.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT