junnar marke
junnar marke 
पुणे

शेतकऱ्यांच्या निशिबी पुन्हा लाल चिखल...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात एक महिन्यानंतर कोथिंबीर व मेथीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. 

नारायणगाव उपबाजारात रात्री कोथिंबीर व मेथीच्या चार लाख जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला सहा ते सात रुपये; तर मेथीच्या जुडीला तीन ते चार रुपये भाव मिळाला. नोव्हेंबर महिन्यात कोथिंबिरीच्या जुडीला सरासरी पन्नास ते साठ रुपये, तर मेथीच्या जुडीला वीस ते पंचवीस रुपये भाव मिळाला होता. 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला उच्चांकी ऐंशी रुपये ते नव्वद रुपयांदरम्यान भाव मिळाला होता. 

ऑक्‍टोबर महिन्यात सलग वीस दिवस अवकाळी पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे उपबाजारात नोव्हेंबर महिन्यात कोथिंबीर व मेथीची आवक घटली होती. त्यातून नोव्हेंबर महिन्यात प्रामुख्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत राहिले. उपबाजारात रोज कोथिंबीर व मेथीच्या सुमारे तीन लाख जुड्यांची आवक होत असते. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कोथिंबीर व मेथीच्या जुड्यांची रोज ऐंशी ते नव्वद हजारांपर्यंतच आवक होत होती.

आवक कमी झाल्याने नोव्हेंबर महिन्यात कोथिंबिरीला शेकडा दोन हजार ते नऊ हजार रुपयांदरम्यान; तर मेथीला दोन हजार ते पाच हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला. त्यामुळे कोथिंबीर व मेथी उत्पादक शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिना फायदेशीर ठरला. नोव्हेंबर महिन्यात येथील उपबाजारात कोथिंबीर व मेथीच्या विक्रीतून सुमारे आठ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. 

शेतकरी नाराज 
नारायणगाव उपबाजारात गुरुवारी (ता. 12) रात्री कोथिंबिरीच्या 1 लाख 84 हजार 900 जुड्यांची, मेथीच्या 2 लाख 9 हजार जुड्यांची, शेपूच्या 12 हजार 900 जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला शेकडा दोनशे रुपये ते बाराशे रुपये; तर मेथीच्या जुडीला शेकडा शंभर रुपये ते सहाशे रुपयांदरम्यान भाव मिळाला. आज उपबाजार आवारात टोमॅटोच्या सातशे क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलो) ऐंशी रुपये ते दीडशे रुपयांदरम्यान भाव मिळाला. बाजारभाव घसरल्याने उत्पादक शेतकरी नाराज झाले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT