मार्केट यार्ड, ता. ८ : गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी विभागात रविवारी (ता. ८) शेतमालाची आवक तुलनेने कमी झाली. राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला होता. बाजारात ग्राहकांची वर्दळही कमी असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार काहीसे मंदावले होते. आवक घटली असली, तरी त्याच प्रमाणात मागणीही कमी असल्याने भावावर विशेष परिणाम झाला नाही. परिणामी, सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले.
परराज्यांतून झालेल्या आवकेत कर्नाटक आणि गुजरातमधून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटकातून कोबी तीन, घेवडा आणि पावटा प्रत्येकी दोन टेम्पो, गुजरातमधून भुईमूग शेंगा दोन टेम्पो, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून मटार एक टेम्पो, इंदूरमधून गाजर ५ आणि दिल्लीतून एक टेम्पो, आंध्र प्रदेश व तमिळनाडूतून शेवगा तीन टेम्पो, बंगळुरूहून आले तीन टेम्पो, तमिळनाडूतून तोतापुरी कैरी १०० क्रेट, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे १० टेम्पो, तर इंदूर आणि आग्रा येथून बटाट्याची चार टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले सुमारे ४०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी तीन टेम्पो, टोमॅटो सात हजार क्रेट, हिरवी मिरची तीन टेम्पो, काकडी पाच टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी पाच टेम्पो, ढोबळी मिरची सात टेम्पो, गाजर पाच टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, घेवडा दोन टेम्पो, तर कांद्याची सुमारे ५० टेम्पो इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव (रुपयांत)
कांदा : ३५०-४२०, बटाटा : १००-१८०, लसूण : ८००-२५००, सातारी आले : ५००-६००, भेंडी : २००-३५०, गवार : ४००-६००, टोमॅटो : ८०-१३०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ४००-४५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : २५०-३००, हिरवी कारली : २००-२५०, पांढरी कारली : १००-१५०, पापडी : ४००-५००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ५०-६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ४००-४५०, कळी तोंडली : ३५०-४००, जाड तोंडली : २००-२२०, शेवगा : ५००-६००, गाजर : २५०-३००, दिल्ली गाजर : ७०-८०, वालवर : ३००-३५०, बीट : १५०-१६०, घेवडा : ३००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ७००-८००, मटार : ९००-१३००, पावटा : ४००-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ८००-१०००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांची आवक
पालेभाज्यांच्या विभागात रविवारी कोथिंबिरीच्या सुमारे १ लाख ४० हजार जुड्या, तर मेथीच्या सुमारे १ लाख जुड्यांची आवक झाली. ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने पालेभाज्यांच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम जाणवला.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव (रुपयांत) : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ५००-८००, शेपू : ८००-१०००, कांदापात : १०००-१२००, चाकवत : १०००-१२००, करडई : ८००-१०००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १६००-१८००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ८००-१०००.
डाळिंबाच्या भावात वाढ
मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात रविवारी खरबूज, लिंबू, ड्रॅगन फ्रूट आणि पेरूच्या भावात घट झाली. दुसरीकडे डाळिंबाच्या भावात वाढ झाली असून, कलिंगड, पपई, सीताफळ, चिक्कू, अननस, संत्री आणि मोसंबीचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. बाजारात विविध फळांची आवक सुरू असून, आवक आणि मागणीतील चढ-उतारांचा परिणाम काही फळांच्या भावावर झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी लिंबू ७०० ते ९०० गोणी, मोसंबी ४० ते ५० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई नऊ ते १० टेम्पो, कलिंगड सात ते आठ गाड्या, खरबूज पाच ते सहा टेम्पो, चिक्कू एक हजार डाग, पेरू दीड ते दोन हजार क्रेट, सीताफळ १० ते १२ टन, ड्रॅगन फ्रूट १२ ते १३ टन, सफरचंद चार ते पाच हजार पेट्या, तर अननसाची सहा ट्रक आवक झाली.
फळांचे घाऊक भाव (रुपयांत)
लिंबू (प्रतिगोणी) : ३००-१६००, मोसंबी (तीन डझन) : १५०-३५०, मोसंबी (चार डझन) : ५०-६०, संत्री (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ६०-३००, आरक्ता : १०-६०, गणेश : ५-४०, कलिंगड (प्रतिकिलो) : ८-१२, खरबूज (प्रतिकिलो) : १५-३०, पपई (प्रतिकिलो) : १२-२५, चिक्कू (१० किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : २००-५००, अननस (एक डझन) : ३००-९००, सीताफळ (प्रतिकिलो) : २०-१२०, ड्रॅगन फ्रूट (प्रतिकिलो) : ५०-८०, काश्मीर डेलिशियस सफरचंद (१५ ते १६ किलो) : १२००-१८००, किन्नोर सफरचंद (२०-२५ किलो) : ४०००-४५००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.