market yard police action tadipaar accused arrested pune crime update  Sakal
पुणे

Pune Crime News : मार्केट यार्ड पोलिसांनी तडीपार गुन्हेगाराला पाठलाग करून पकडले

मार्केट यार्ड परिसरात धारदार शस्त्र हवेत फिरवत दहशत माजविणाऱ्या सराईत तडीपार गुन्हेगाराला पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून धारदार हत्यार जप्त करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : मार्केट यार्ड परिसरात धारदार शस्त्र हवेत फिरवत दहशत माजविणाऱ्या सराईत तडीपार गुन्हेगाराला पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून धारदार हत्यार जप्त करण्यात आले आहे.

सागर मच्छिंद्र इंजे (रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरात गणेश जयंतीनिमित्त मिरवणूक होती. त्यामुळे आंबेडकरनगर झोपडपट्टी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस गस्तीवर होते. त्यावेळी तडीपार सागर इंजे हवेत शस्त्र फिरवत दहशत माजवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्याचा शोध घेतला असता तो आंबेडकरनगर परिसरात आढळून आला. पोलिसांची नजरानजर झाली असता तो पळून जात होता. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून सुरा जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त शाहूराज साळवे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT