jun 
पुणे

नागरिकांच्या बेपर्वाईमुळे जुन्नरमध्ये घेतला हा कडक निर्णय 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) :  जुन्नर शहरातील बाजारपेठा आजपासून (ता. 18) नगर पालिका प्रशासनाने बंद केल्या. त्यामुळे बाजारपेठेतील वाहनांची वर्दळ अचानक थांबली असल्याचे पहावयास मिळाले. 

जुन्नरला तिसऱ्या लॉकडाउनच्या अखेरच्या टप्प्यात उघडण्यात आलेल्या दुकानातून मोठी गर्दी होत होती. या दुकानातून सोशल डिस्टंन्सींगचे नागरिक उल्लंघन करत होते. मास्कचा वापर अनेकजण करत नव्हते. वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस व पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. याचबरोबर पुणे व मुंबई शहराच्या "रेड झोन'मधून तालुक्‍यात येणारे नागरिक होम क्वारंटाइन करूनही फिरत असल्याची चर्चा होती. 

वृत्तवाहिनीविरोधात शेतकऱ्यांनी ठोकला  

या सर्व बाबी आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो की काय, या शंकेने चिंताग्रस्त झाले होते. त्यात जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानासह कापड, सोनेचांदी, स्टेशनरी, हार्डवेअर, इलेक्‍ट्रॉनिक आदी दुकानात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आवरणे डोईजड होऊ लागले. त्यामुळे बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नगराध्यक्ष श्‍याम पांडे यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धान्य बाजार, नेहरू बाजार, सराई पेठ या प्रमुख बाजारपेठांत दुपारी दोन वाजेपर्यंत वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हे मार्ग बांबू लावून बंद केल्याने चारचाकी व दुचाकीला बाजारपेठेत प्रवेश बंद झाला असल्याने नागरिक खरेदीसाठी पायी फिरताना दिसत होते. शहरात रात्रीची संचारबंदी कायम राहणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नगर पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी केले आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT