पुणे

फ्लॅट खरेदीसाठी विवाहितेचा छळ

CD

लोणी काळभोर, ता. २५ : नवीन फ्लॅट खरेदीसाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पती संदेश नवनाथ वारे, सासू निर्मला नवनाथ वारे, सासरे नवनाथ वारे आणि दीर संकेत नवनाथ वारे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेचा विवाह मे २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही महिने संसार सुरळीत चालल्यानंतर, सासरच्यांनी किरकोळ कारणावरून छळ सुरू केला.
तक्रारीनुसार, महिला गर्भवती असतानाही तिला जड कामे करण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे तिला शारीरिक त्रास झाला. त्यानंतर पतीने व सासूने फ्लॅटसाठी १० लाख रुपयांची मागणी लावून धरली. पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याने तिला मारहाण करण्यात आली. २२ जुलै २०२६ रोजी आरोपींनी पीडितेच्या नातेवाइकांना बोलावून अपमानित केले आणि ‘पैसे देणार नसाल तर मुलीला घेऊन जा’ असे धमकावून तिला घराबाहेर काढले, तसेच तिचे दागिने व साहित्य स्वतःकडे ठेवून घेतले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daund Crime : रुग्णालयाबाहेर कुटुंबावर जीवघेणा हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा

IND vs SL: रिषभ पंतला नेमकं काय झालंय, विकेटकिपिंग का करत नाहीये? प्रशिक्षकांनी अखेर सत्य सांगितलं

Maharashtra Rain: पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Pune Adivasi Students : मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन तापलं; उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

Arvind Kejriwal : 'आमची सत्ता आली तर, ई-२० पेट्रोलवर ५ दिवसांत बंदी घालणार'... केजरीवाल यांची गोव्यात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT