MLA_Wedding 
पुणे

भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात ५० जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे, पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झालेली पाहायला मिळाली. स्वाभाविकपणे मास्क आणि शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) या नियमांचं काय झालं हे लग्नाला उपस्थित मंडळींना दिसून आलं.

विशेष म्हणजे या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि अद्याप लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनाच 'दो गज की दूरी, मास्क पेहनना है जरूरी' चा विसर पडला. विवाह सोहळ्यात ५० जणांची मर्यादा पाळण्याचा नियम लोकप्रतिनिधींनीच मोडणे, हे खेदजनक आहे. 

भाजप आमदार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याला विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देताना वधू-वर आणि राजकीय वऱ्हाडी मंडळींनी मात्र 'सर्वसामान्य माणसांना एक नियम आणि आपल्याला एक' असं समजू नये. कारण कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी हे संकट टळलेले नाही. आणि लोकप्रतिनिधींदेखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सर्व नियम पाळावेत, एवढीच अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

IND vs SL: श्रीलंकन खेळाडूशी धडक, केएल राहुलचा कॉलचा गोंधळ अन् यशस्वी जैस्वाल रनआऊट! गॉलमध्ये ड्रामा...पाहा Video

SCROLL FOR NEXT