pithla and bhakri sakal
पुणे

Bhor News : लग्नाच्या पंगतीतही आता पिठलं अन् भाकरीचा बेत

सध्या लग्न म्हटले की कार्यालय, आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीच्या बरोबर जेवणाचा हॉल आणि जेवणात उच्च पध्दतीचे पदार्थ असे समीकरण झालेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोर - सध्या लग्न म्हटले की कार्यालय, आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीच्या बरोबर जेवणाचा हॉल आणि जेवणात उच्च पध्दतीचे पदार्थ असे समीकरण झालेले आहे. लग्नकार्याच्या जेवणात नेहमी पनीर, बटाटा, वांगी, मटार, आमटी, भजी, पुरी आणि गुलाबजाम, लाडू किंवा जिलेबीसारखे गोड अशा प्रकारचे पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. या आहारामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यासाठी नागरिकांनी आता लग्नकार्यातही ग्रामीण भागातील सात्त्विक अन्नपदार्थ ठेवण्यास सुरुवात केली आहे.

भोरमधील प्राथमिक शिक्षक राजू कारभळ यांनी आपल्या मुलीच्या लग्नात इतर नियमीत पदार्थांबरोबर चक्क महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पिठलं-भाकरी आणि ठेचा असे पदार्थही ठेवले होते. त्यामुळे लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी लग्नात जेवण करून शरीराला त्रास करून घेण्यापेक्षा इतर पदार्थाशिवाय पिठलं-भाकरी आणि ठेचा खाण्यास सहमती दर्शवली.

या लग्न सोहळ्याच्या जेवणातील पुरी-भाजी, वरण-भात, भजी, पापड, रायता व गुलाबजामपेक्षाही पिठलं-भाकरीची चर्चा जास्त होती. ज्वारीची भाकरी आणि गरमागरम पिठलं खाऊन पाहुणे तृप्त झाले.

लग्नात पंचपक्वान्नापेक्षाही घरच्यासारखे पचन होणारी पिठलं-भाकरी आणि त्यासमवेत गावरान मिरचीचा ठेचा मिळाल्यामुळे उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे लग्नातही जेवणाच्या पदार्थांचा ट्रेंड बदलत चालला असून नागरिक पुन्हा सात्त्विक आहाराकडे वळू लागले आहेत. एकंदरीत लग्नाकार्यालत जेवणातील पदार्थांचा ट्रेंड बदलत चालला आहे, हे मात्र नक्कीच असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result : 'गोकुळ'च्या निकालाने मंडलिक-मुश्रीफ वादाला उकळी! वीरेंद्र मंडलिक 'इन', नविद 'आउट; वाचा हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या पराभवामागची Inside story

Shoumika Mahadik Gokul Election : शौमिका महाडिकांना गोकुळमधील पराभव जिव्हारी; सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया

Success Story: आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, पण यश पाहायला तेच जगात नाहीत; दीपांशुने तिसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये मिळवला ३८ वा क्रमांक!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट, दसरा मेळावा साधेपणाने : मंत्री सरनाईक

मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे, अर्धनग्नावस्थेत 2 तास भयानक पूजा; महिलेची ७ लाखांची फसवणूक, भोंदूविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT