Pune married woman commits suicide by pouring petrol on herself 
पुणे

पती म्हणाला, मी तुला सांभाळणार नाही म्हणून पत्नीने घेतले स्वत:ला पेटवून

सकाळवृत्तसेवा

पुणे : पहिले लग्न झालेले असतानाही पतीने दुसरे लग्न केले. तेवढ्यावरच न थांबता दुसऱ्या पत्नीलाही मानसिक व शारीरिक त्रास दिला. या सगळ्या प्रकारास कंटाळून दुसऱ्या पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता आंबेगाव बुद्रूक येथे घडली. 

पुणे : पिरंगुटमध्ये दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही
भाग्यश्री राहुल शिरुरे (वय 26, रा. संतोषनगर कात्रज) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. राहुल ऊर्फ कोंडिबा पुंडलिक शिरुरे (वय 40) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सोलापूर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अरे बापरे! मानाच्या विड्यासाठी मोजले तब्बल ३० लाख! कोठे ते पहा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण भाग्यश्री हिचे राहुल शिरुरे यांच्यासमवेत लग्न झाले होते. परंतु राहुल शिरुरे याने त्याचे पहिले लग्न झाल्याचे फिर्यादी व त्यांच्या बहिणीपासून लपवून ठेवले. त्यानंतर त्याने भाग्यश्री हिला पत्नीप्रमाणे वागणूक न देता तिचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरवात केली.

फक्त मौज-मजेसाठी 'त्यांनी' चोरल्या 25 दुचाकी
दरम्यान, गुरुवारी भाग्यश्री ही तिच्या पतीच्या घरी गेली. तिने "तु माझा फोन का उचलत नाहीस', असा जाब विचारला. त्यावेळी तिच्या पतीने तिला "मी तुला सांभाळणार नाही, तुला मरायचे असेल तर मरून जा' असे सांगून भाग्यश्री हीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने भाग्यश्रीने पेट्रोल विकत आणून पतीच्या राहत्या घरी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी भाग्यश्रीच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी शिरुरे यास अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT