छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
श्रीरामपूर, ता. २८ : मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे आणि मामेसासऱ्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात आली आहे.
सायली प्रतीक वानखेडे (वय २३, रा. महांकाळ वडगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह १० ऑगस्ट २०२५ रोजी प्रतीक वानखेडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी पतीला मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार माहेरच्या नातेवाइकांनी ही रक्कम दिली. त्यानंतरही आणखी एक लाख रुपयांची मागणी करून घरकामावरून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या त्रासाला कंटाळून सायली हिने १८ ऑक्टोबर रोजी विषारी औषध सेवन केले. तिला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १९ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत विवाहितेची आई कावेरी थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रतीक दीपक वानखेडे, सासरे दीपक पांडुरंग वानखेडे, सासू नंदा वानखेडे (सर्व रा. महांकाळ वडगाव) आणि मामेसासरे अमोल रघुनाथ चोंडके (रा. निपाणी वडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.