Women suicide sakal
पुणे

Pune Crime : स्वयंपाकावरुन टोमणे; विवाहितेची आत्महत्या

चांगला स्वयंपाक करता येत नाही, नीट भांडी घासत नाहीस, असे सातत्याने टोमणे मारल्याने विवाहितेची आत्महत्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - चांगला स्वयंपाक करता येत नाही, नीट भांडी घासत नाहीस, असे सातत्याने टोमणे मारल्याने. तसेच सासरच्या शारिरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२९) येरवडा भागात घडली.

अश्विनी बाळू पवार (वय २२, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी यांची आई सुनंदा पवार (वय ४७) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीला स्वयंपाक नीट जमत नाही, तसेच ती नीट भांडी घासत नसल्याचे टोमणे पती, सासू, सासरे, दीर मारत होते. सासरी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. टोमणे मारण्यात आल्याने, तसेच शारिरिक आणि मानसिक छळ केल्याने अश्‍विनी यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT