संगमवाडी - सुरक्षिततेसाठी पीएमपीच्या सर्व बसगाड्या एकत्र आणून ठेवल्या होत्या. 
पुणे

Maratha Kranti Morcha: एसटी, पीएमपीला पावणेदोन कोटींचा फटका

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी टॅक्‍सीचीही किरकोळ वाहतूक सुरू होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंदमुळे एसटी आणि पीएमपीचे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पुण्यातून सुटणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या एसटीच्या ४५०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे एसटीच्या पुणे विभागाचे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

पीएमपीची वाहतूक सकाळच्या सत्रात काही प्रमाणात सुरू होती. मात्र, आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्याने दुपारी एकनंतर पीएमपीची बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. या दरम्यान शनिपार, बिबवेवाडी, लक्ष्मी रोड, मांजरगाव आणि मार्केट यार्ड या ठिकाणी पीएमपीच्या गाड्यांच्या काचा फोडणे, हवा सोडून देणे अशा घटना घडल्या. सातशे पन्नास फेऱ्या रद्द केल्यामुळे जवळपास ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी दिली. शहरातील रिक्षासेवेवरही या बंदचा परिणाम झाला. ओला-उबेर कंपन्यांच्याही गाड्या फोडण्याचे प्रकार घडल्याने सेवा बंद ठेवण्यात आली. शहरात काही ठिकाणी रिक्षा तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यामुळे दुपारनंतर सर्व रिक्षा बंद होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे दुष्काळ दौरा भेटीसाठी परभणी दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT