पुणे

‘मसाप’च्या वर्धापनदिन स्वरूपात बदल

CD

पुणे, ता. १९ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वर्धापन दिन सोहळ्याच्या स्वरूपात जवळपास दहा वर्षांनंतर ठळक बदल केले जाणार आहेत. नव्या कार्यकारिणीने यंदा दोन ऐवजी एकच दिवस कार्यक्रम, स्थळ बदल, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असे विविध बदल वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मसापच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे स्वरूप दोन दिवसांचे होते. यात २६ मे रोजी ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिकांचे वितरण, तर २७ मे रोजी जीवनगौरव पुरस्कार, कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण होत असे. यंदा हे दोन्ही पुरस्कार वितरण सोहळे २६ मे रोजीच होणार आहेत. ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिक वितरणाची व्याप्ती पाहता हा सोहळा नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्याचा निर्णय मागील कार्यकारिणीने घेतला होता. २७ मे हा ‘मसाप’चा स्थापनादिन असल्याने त्या दिवशीचा ‘जीवनगौरव’ आणि ‘कार्यकर्ता पुरस्कार’ वितरण सोहळा मात्र मसापच्या सभागृहातच होत असे. यंदा दोन्ही कार्यक्रम २६ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होतील. तसेच, नव्या कार्यकारिणीने यंदा सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, यादिवशीच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. वर्धापन दिनानिमित्त २७ मे रोजी मसापच्या वास्तूत चहापान होणार आहे.

अन्य भाषिक साहित्यिक यंदा नाहीत
ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिक वितरणासाठी मागील कार्यकारिणीने मराठीव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमधील ज्येष्ठ साहित्यिकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचा पायंडा पाडला होता. त्यातून अशोक वाजपेयी, डॉ. रामचंद्र गुहा, डॉ. सूर्यबाला, सविता सिंह, माधव कौशिक असे अनेक दिग्गज साहित्यिक या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. त्यांची अभ्यासू भाषणे ही पुणेकरांसाठी वैचारिक पर्वणी होती. यंदा मात्र नव्या कार्यकारिणीला नियुक्ती झाल्यानंतर वर्धापन दिनाच्या नियोजनासाठी पुरेसा वेळ हाती नव्हता. त्यामुळे हा पायंडा मोडला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT