पुणे

मसाप

CD

मसापवर चोभे, शिंदे, साबळे यांची नियुक्ती
संघटनेत फेरबदल ः नांदी संमेलनाच्या नियोजनाला वेग
अहिल्यानगर, ता. १७ : मसापच्या अहिल्यानगर शाखेच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र चोभे पाटील, उपाध्यक्षपदी डॉ. श्याम शिंदे, तर सहकार्यवाहपदी पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. निमंत्रकपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची निवड झाली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अहिल्यानगर शाखेच्या कार्यकारणीची बैठक नूतन अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली जाधव लॉन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विविध विषयांवर चर्चा करून सर्व निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
बैठकीस कार्यवाह शिल्पा रसाळ, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, माजी अध्यक्ष किशोर मरकड, पोपटराव धामणे, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. काळे, प्राचार्य विश्वासराव काळे आदी उपस्थित होते. या बैठकीत श्रावणधारा खुले काव्य संमेलन ३० ऑगस्ट रोजी चांदबिबी महालावर सकाळी ११ वाजता होणार आहे.
.............
विघातक प्रवृत्तींना आळा
मसापचे नगर शाखेचे कार्याध्यक्ष चं. वि. जोशी आणि उपाध्यक्ष दशरथ खोसे यांनी व्यक्तिगत कारणास्तव परिषदेकडे आपले राजीनामे दिले होते. बैठकीत दोन्ही राजीनामे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संस्थेची प्रतिमा आणि कार्यपद्धतीला बाधा आणणाऱ्या विघातक प्रवृत्तींना थारा न देता संघटनात्मक शिस्त आणि एकजुटीने काम करण्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT