पुणे

मसूर : मसूर जिल्हा परिषद गटात बहुरंगी, वडोली-भिकेश्वर गणात चौरंगी तर मसूर गणात तिरंगी लढती

CD

चुरशीच्या लढतीमुळे मसूरला उत्सुकता

गट-गणांकडे लक्ष; बंडखोर उमेदवारांमुळे वाढली रंगत

मसूर, ता. १ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या घडामोडीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले. परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार मैदानात असल्याने लढती रंगतदार हाेणार आहेत. त्यामुळे मसूर जिल्हा परिषद गटात बहुरंगी, वडोली भिकेश्वर पंचायत समिती गणात चौरंगी, तर मसूर गणात तिरंगी लढत होत असल्याने मतदारांत उत्सुकता वाढली आहे.

येथील जिल्हा परिषद गटात पाच उमेदवार रिंगणात असून, प्रमुख पक्षांसह दोन अपक्ष उमेदवारांमुळे ही लढत बहुरंगी झाली आहे. शिवसेनेतर्फे सोमनाथ चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे मानसिंगराव जगदाळे, भाजपकडून लालासाहेब जगदाळे हे प्रमुख उमेदवार आहेत, तर अपक्ष म्हणून प्रमोद गायकवाड व सचिन क्षीरसागर रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला असून, गावोगावी भेटीगाठी, बैठका व प्रचार फेऱ्यांना वेग आला आहे.
मसूर गणात तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संजय शंकर घोलप, भाजपकडून संतोष पाटील, तर अपक्ष म्हणून संजय ऊर्फ गजानन शिरतोडे हे उमेदवार मैदानात आहेत. वडोली भिकेश्वर गणात तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार व एका अपक्षामुळे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ऊर्मिला जाधव, काँग्रेसकडून प्रियांका पवार, भाजपतर्फे कोमल यादव, तर अपक्ष म्हणून दीपाली खोत यांनी उमेदवारी दाखल केली आहे. महिला उमेदवारांसाठी हा गण राखीव असल्याने विशेष लक्षवेधी ठरत आहे. यात महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
चिन्ह मिळाल्यावर प्रचाराला वेग आला असून, मतदारसंघातील गावात बॅनर लावण्याची चढाओढ सुरू आहे. सर्वच पक्षाने मोक्याच्या जागी प्रचाराचे बॅनर लावले आहेत. प्रचार गाड्यातूनही उमेदवारांचा गावोगावी प्रचार सुरू आहे. सर्वच गट- गणांत प्रचाराला जोमाने सुरुवात झाली असून, प्रत्येक उमेदवार विकास, स्थानिक प्रश्न व घरभेटीबरोबरच जनसंपर्कावर भर देताना दिसत आहे. प्रत्येकाचा प्रचार वेगाने सुरू असून, प्रत्यक्षात कोण बाजी मारणार? याकडे परिसराचे लक्ष आहे.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT