पुणे

राजशिष्टाचार विभागाला मॅटचा दणका

CD

राजशिष्टाचार विभागाला ‘मॅट’चा दणका

चालकाची नागपूरला केलेली बदली रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईतील शासकीय परिवहन सेवेतील (जीटीएस), व्हीआयपी व व्हीव्हीआयपी सेवेसाठी कार्यरत चालकाची नागपूर येथे करण्यात आलेली बदली बेकायदा असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) नोंदवले आणि बदलीचा आदेश रद्द केला.
व्हीआयपी व व्हीव्हीआयपी सेवेमध्ये कार्यरत चालक सुनील वाघ यांची तडकाफडकी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार शाखेत बदली करण्यात आली. त्या निर्णयाला वाघ यांनी ‘मॅट’कडे आव्हान दिले होते. जीटीएसचे मुंबई हे कार्यालय महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५च्या कक्षेतून वगळल्याची माहिती राजशिष्टाचार विभागास उपलब्ध असतानाही ही महत्त्वाची बाब प्रस्तावामध्ये नमूद न करता चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करून हा बदल केल्याचा दावा वाघ यांच्या वतीने ॲड. राजेश्वर पांचाळ, ॲड. कैलास जाधव व ॲड. सारंग गुंडजवार यांनी ‘मॅट’समोर मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

Akole News: महिना उलटला तरी पुस्तकं मिळेनात! अकोलेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण समिती अध्यक्षांचा तीव्र संताप

Commonwealth Games 2026 स्पर्धेत क्रिकेटसह कुस्ती, बॅटमिंटनचा समावेश का केलेला नाही? कारण घ्या जाणून

Barshi Accident: बार्शी हादरली! रस्त्यावरून घरी जाताना शिक्षक व चिमुकल्याचा जीव गेला; बार्शीत भीषण अपघात

SCROLL FOR NEXT