Crime_Arrest 
पुणे

हॉस्पिटलमधून डायरेक्ट कस्टडीत; गुंडासह मटका किंगची 'मोक्का' कोठडीत रवानगी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : टोळीच्या वर्चस्व वादातून तरुणासह त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कुख्यात गुंड सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि मटकाकिंग नंदकुमार बाबूराव नाईक यांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला.
या बाबत ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. ७६७ गणेश पेठ. सध्या रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली.

या प्रकरणात ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. २१ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास बांबू आळी परिसरात कुडले यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून तसेच टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या कारणावरून आंदेकर याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी हा कट रचला. त्यानंतर कोयते, पालघण यांसारख्या धारदार हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अटक झाल्यानंतर आंदेकर आणि नाईक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली. आंदेकर याच्या टोळीतील गुंडांनी मागील महिन्यात जीव घेणे हल्ल्यासारखे गुन्हे केले आहेत. त्यांना घातक शस्त्रे, वाहने आणि मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन करत आर्थिक पुरवठा केला आहे. आंदेकर आणि नाईक यांनी व्यापक स्वरूपाचा गुन्हेगारी कट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आंदेकर याने संघटितरीत्या गुन्हेगारी करून मिळविलेल्या आर्थिक लाभातून स्थावर आणि जंगम मालमत्ता घेतल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. त्याबाबतच तपास करायचा असल्याने त्याला मोक्का कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

कुडले याला जीवे ठार मारण्यासाठी आंदेकर याने पाच लाख रुपये आरोपींना दिले. त्याने हे पैसे कोणाकडून आणले अथवा नाईक याने हे पैसे दिले आहेत का? यादृष्टीने तपास करायचा आहे, असे ॲड. बोंबटकर यांनी न्यायालयास सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT