पौड रस्ता - वाचनालयापुढे पडलेला कचरा, वाळलेली झाडे.
पौड रस्ता - वाचनालयापुढे पडलेला कचरा, वाळलेली झाडे. 
पुणे

माथवड मंडईजवळील सौंदर्यशिल्पाची दुरवस्था

सकाळवृत्तसेवा

पौड रस्ता - कोथरूडच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी व वाचकांना चांगले वाचनाचे ठिकाण उपलब्ध करण्यासाठी गुजरात कॉलनीतील माथवड मंडईजवळ बांधण्यात आलेल्या रानवडे वाचनालय व सौंदर्यशिल्पाची दुरवस्था झाली आहे.

वाचनालय मद्यपींचा अड्डा बनले असून, सौंदर्यशिल्पातील धबधबा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या जागेला नवसंजीवनी देण्याची मागणी होत आहे.
माथवड मंडई परिसरात पूर्वी भाजीमंडईतील कचरा टाकला जात होता. याचा त्रास नागरिकांना होत होता. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी येथे एक सौंदर्यशिल्प उभारण्यात आले. सुंदर फूल झाडे, पाण्याचा धबधबा, नागरिकांना बसता येईल अशी जागा, थोडी हिरवळ यामुळे ही जागा म्हणजे सेल्फी पॉइंट बनली होती. तसेच येथे लोकांचा राबता राहावा म्हणून येथे खुले वाचनालय सुरू करण्यात आले; पण मागील दोन वर्षांपासून वाचनालयात मद्यपींचा वावर वाढला आहे. तसेच सौंदर्यशिल्पाचे विद्रुपीकरण झाले आहे. येथील झाडे वाळली आहेत, तर धबधबा बंद अवस्थेत आहे.  त्यामुळे महापालिकेने या जागेची देखभाल करून जागेला नवसंजीवनी देण्याची मागणी स्थानिक नागरिक उमेश भेलके, संजय मानकर, किशोर मारणे, युवराज मदगे, सुहास उभे आदींनी केली आहे.

कै. पांडुरंग रामभाऊ रानवडे वाचनालयात मद्यपी दररोज बसलेले असतात. या ठिकाणी वाचायला पेपर, पुस्तके दिसत नाहीत. वाचनालयासमोर घाण पडलेली आहे, तर फुटपाथ तुटलेल्या अवस्थेत आहे. सौंदर्यशिल्पातील झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. धबधबा बंद आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. 
- संजय मानकर, नागरिक 

सध्या या जागेचा वापर मद्यपींकडून होत असल्याचे दिसते. रस्ता रुंदीकरणात या जागेचा काही भाग जाणार आहे. त्यानंतर ही जागा बंदिस्त करून तेथे नागरिकांच्या उपयोगाचे काही करता येईल.
- वासंती जाधव, नगरसेविका

उद्यान विभागाने येथे सौंदर्यशिल्प उभारले होते. नंतर वाचनालयाची शेड बांधण्यात आली. येथील पदपथ नादुरुस्त झाला आहे. झाडे वाळली आहेत. येथे तातडीने आवश्‍यक सफाई व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. नवीन फुलझाडे लावून ही जागा सुशोभित करू.  
- शिशिर बहुलीकर, सहायक आयुक्‍त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT