mau.jpg
mau.jpg 
पुणे

आळंदीत माऊली जन्मोत्सव उत्साहात साजरा

सकाळवृत्तसेवा

आळंदी : कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा,चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा असे म्हणत उपस्थित भाविकांनी टाळ मृदंगाचा गजर आणि माऊली नामाचा अखंड जयघोष केला. अशा भारलेल्या वातावरणात माऊलींच्या संजीवन समाधीवर आज मध्यरात्री बारा वाजता गुलाबांची पुष्पवृष्टी, पेढे, सुंठवडा वाटून आळंदीतील देऊळवाड्यात माऊली जन्मोत्सव साजरा झाला.

यावेळी माऊली माऊलीचा गजर आणि घंटानादाने परिसर दुमदुमुन गेला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देऊळ बंद असल्याने माउली जन्म आणि कृष्ण जन्मानिमित्त मोजक्याच वारक-यांच्या उपस्थितीत परंपरेने माऊली जन्माचा कार्यक्रम करण्यात आला.

आळंदी देवस्थानच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. दरम्यान मंगळवारी (ता. ११) रात्री देऊळवाड्यात धुपारती झाल्यानंतर नऊ ते साडे नऊ हरिपाठ झाला.त्यानंतर तयारी सुरू झाली ती माऊलीजन्माची. माऊली जन्माचा सोहळा समिप आल्याने मोजक्याच आळंदीकर भाविकांना पान दरवाजातून मंदिरात सोडण्यास सुरूवात केली. दहा ते बारा या वेळेत पंखा मंडपात गजानन लाहूडकर यांचे किर्तन तर विणा मंडपात आळंदीकरांचे भजन एकाच वेळी सुरू होते.

दरम्यान, मुक्ताबाई मंडपात बारा ते साडे बारा प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते कृष्ण जन्मानिमित्त गोकूळ पूजन झाले. त्यानंतर वेध लागले ते माऊली जन्माचे. पुजारी राजाभाऊ चौधरी, यज्ञेश्वर जोशी, अमोल गांधी, महेश जोशी यांनी मुख्य समाधी गाभारा स्वच्छ केला आणि समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून अत्तराचा दर्प देत समाधी सजविली. भरजरी भगवा मेखला, आकर्षक फुलांच्या माळा आणि तुळशीच्या मंजि-यांनी बनविला हार सजविलेल्या माऊलींच्या समाधीवर लक्ष वेधून घेत होता. माऊलींचे हे मनमोहक रूप भाविकांनी नयनात साठविले. आकर्षक फूलांची सजावट संपूर्ण समाधी मंदिर गाभा-याला केली होती.

दरम्यान, पंखा मंडपातील लाहूडकर महाराजांनी ठिक बाराच्या वाजता माऊली जन्माचे किर्तनात माउली जन्माचे वर्णन करताच भाविकांनी समाधीवर पुष्पवृष्टी करत माऊलीनामाचा जयघोष केला. त्यानंतर घंटानाद केला आणि पेढे, सुंठवडा वाटण्यात आला. माजी नगरसेवक डी. डी. भोसले यांच्या वतीने फराळ वाटण्यात आला.

तसेच देवस्थानच्या वतीने मानक-यांना नारळ-प्रसाद वाटप केला. यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांची उपस्थित होते. माऊली जन्मासाठी माजी नगराध्यक्ष राहूल चिताळकर, स्विकृत नगरसेवक संदिप रासकर, निलेश महाराज लोंढे, राजू नहार, प्रकाश काळे, संतोष मोझे, योगेश आरू, भिमाशंकर वाघमारे, बल्लाळेश्वर बाळासाहेब कु-हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. माऊली जन्माच्या सोहळ्यानंतर जागराचा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान वीणा मंडपात प्रशांत मोरे यांचे काल्याच्या किर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT