पुणे

मावळात बहरतेय कृषी पर्यटन

CD

ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. १५ : नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत कृषी पर्यटनही मोठ्या प्रमाणावर बहरले असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. काही तरुणांनी कल्पकतेने उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पवन मावळातील ‘अंजनवेल’
‘अंजनवेल’ हे पवन मावळातील दुर्गम अशा शिळींब गावातील कृषी पर्यटन केंद्र आहे. स्थानिक शेतकरी रमेश जगताप यांनी १२ एकर परिसरातल्या ओसाड माळरानावर गेली सुमारे १५ वर्षांपासून परिश्रम करत नंदनवन फुलवले आहे. डोंगर उतारावरच्या खडकाळ जमिनीला, दगडाच्या ताली बांधून असंख्य स्थानिक झाडे लावून आकार दिला आहे. ओढ्याला लागून असलेली भातशेती, वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक भेरली माडाच्या झाडांची लागवड आणि रोपवाटिका हे इथले आणखी एक विशेष आकर्षण आहे. सुमारे २५ महिलांचा गट येथील स्वयंपाकाचे व्यवस्थापन, कुंभारकाम, कांस्य थाळी मालिश, स्थानिक पदार्थांची विक्री असे उपक्रम सांभाळत आहे. काजवा महोत्सव, भात लावणी उत्सव, रानभाजी महोत्सव असे अनेक उपक्रम येथे सुरू आहेत. लवकरच इथल्या स्थानिक युवकांना घेऊन परिसरात वारसा सहली, कृषी आधारित अनुभव, पक्षी निरीक्षण असे उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.

मावळ तालुक्याचे सर्वार्थाने पूरक भौगोलिक स्थान, इथल्या जैवविविधतेतील समृद्धी लक्षात घेता आगामी काळात कृषी पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. येथील स्थानिक युवकांनी आदरातिथ्य, पर्यटन सेवा क्षेत्रातील वाढत्या संधीचा लाभ घेत स्वतःचा उत्कर्ष साधावा.
- राहुल जगताप, अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र, शिळींब

दारूंब्रे येथील ‘आनंदमळा’
तालुक्यातील दारूंब्रे येथील समीर वाघोले यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले होते. २०१६ मध्ये पुण्यातील शहरी जीवनाला कंटाळून निसर्गात राहून काहीतरी नवीन करण्याचा विचार घेऊन हे कुटुंब आपल्या मूळ गावी परतले. त्यांनी त्यांच्या दहा एकर शेतीवर नैसर्गिक शेती करण्याचा मनोदय केला. २०१७ मध्ये सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीचे शिबिर करून त्यांनी नैसर्गिक शेतीचा ‘श्रीगणेशा’ केला.

कृषी पर्यटन संकल्पना यशस्वी होण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी इतर रिसॉर्टचे अनुकरण न करता आपली बलस्थाने ओळखून कृषी पर्यटन केंद्राची रचना करणे, पर्यटकांनी गावातील वातावरणात राहण्याची संधी म्हणून याकडे बघणे

मावळातील निसर्ग व शेतीला सांभाळून याचा आनंद घेणे, तसेच शासनाने कृषी पर्यटनाला विविध योजनांतून प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याला विपणनासाठी मदत करणे. शाळांमध्ये मुलांना सहलीसाठी अशा कृषी पर्यटन केंद्रांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहन देणे. या सर्व बाबी विचारात घेता कृषी पर्यटनाला भविष्यात अमर्याद संधी आहेत हे नक्की.
- समीर भरत वाघोले, आनंदमळा कृषी पर्यटन केंद्र, दारूंब्रे

काय आहे ‘आनंदमळा’
- सुमारे २०० प्रकारच्या पिकांची नैसर्गिक शेती. यात ११ प्रकारचे भात, ज्वारी, गहू, बाजरी, कडधान्ये यांचा समावेश
- ४० प्रकारचा भाजीपाला, कोशिंबीर (सलाड), २७ प्रकारची फळे, १६ प्रकारचे बांबू व विविध फुलझाडे लागवड
- शेतमालाला योग्य दर मिळावा म्हणून ‘आनंदमळा’ हा स्वतःचा ब्रँड
- समाजमाध्यमांद्वारे शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात
- २०१९ मध्ये ‘आनंदमळा कृषी पर्यटन’ केंद्राची स्थापना
- पर्यावरणपूरक व स्वच्छ निवास व्यवस्था उपलब्ध, शेतीतील उत्पादनांपासून चुलीवर बनवलेले महाराष्ट्रीय शाकाहारी जेवण
- नैसर्गिक शेतीची शिवार फेरी, भातलावणी महोत्सव, रानभाजी महोत्सव, हुरडा पार्टी
- मुलांसाठी वनशाळा यासारखे शैक्षणिक उपक्रम

मावळ तालुका आणि कृषी पर्यटन
- पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श परिसंस्था मावळला आपसूक लाभली
- पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती असलेल्या मावळचे स्थान पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे
- लोणावळा, खंडाळा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, पवना धरण, भुशी धरण, ठोकळवाडी किंवा कार्ले, भाजे, बेडसे या येथील जगप्रसिद्ध लेण्या, देहू, घोरावडेश्वर, प्रति पंढरपूर, प्रतिशिर्डी, कोंडेश्वर आदी धार्मिक स्थळांचा समावेश
- प्रस्तावित रिंग रोड, मिसिंग लिंक प्रकल्प, स्काय वॉक यासारख्या प्रकल्पांमुळे भविष्यात कृषी पर्यटनात मोठ्या संधी
- शहरी लोकांना आवडणारे नैसर्गिक वातावरण, शांतता, स्वच्छ व सुरक्षित निवास व्यवस्था, गावरान नैसर्गिक जेवण व आपुलकीचे वातावरण

कृषी पर्यटन संकल्पनेचा मूळ उद्देश
- शहरातील पर्यटक पर्यटनाच्या दृष्टीने गावात यावा
- शेतीसोबत पर्यटकांच्या निवास भोजनाची आणि सोबत शेतीचा व निसर्गाचा अनुभव देण्याची सोय
- ग्रामीण अर्थकारणाला गती मिळावी
- शहरातील पैसा गावात यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT