पुणे

पुणे जिल्ह्यातील हे दोन तालुके टँकरमुक्त; तर ८५ गावांचा टँकर अजूनही हटेना!

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील तेरापैकी मावळ आणि वेल्हे या दोन तालुक्यांमधील एकाही गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू करावा लागला नाही. त्यामुळे हे दोन तालुके पुर्णपणे टॅंकरमुक्त झाले आहेत. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ८२ गावांना मागील पाच वर्षांपासून दरवर्षी सातत्याने टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमधील टॅकर काही हटण्याची चिन्हे दिसेना झाली आहेत. यासाठी आता जिल्हा परिषदेने पुढाकार घेत, ही सर्व गावे पर्यायाने पुर्ण पुणे जिल्हा टॅकरमुक्त करण्याचा निश्चय केला आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात सर्वाधिक १९ गावे पुरंदर तालुक्यात तर, सर्वांत कमी केवळ एक गाव दौंड तालुक्यातील आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ही सर्व ८२ गावे कायमस्वरूपी टॅकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी आज (ता.२५) सांगितले.

या ८२ गावांमध्ये आंबेगाव तालुक्यातील पाच, बारामतीमधील सात, भोर - १७, हवेली - ९, दौंड - १, इंदापूर - १०, जुन्नर - ४, खेड - ५, मुळशी - ३, पुरंदर - १९ आणि शिरुर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. ही गावे कायमस्वरूपी टॅकरमुक्त करण्याबाबत विविध ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेत घेण्यात आला आहे.

यानुसार या गावातील पाणीटंचाईचा करुन गावनिहाय टॅकरमुक्ती कृती आराखडा तयार करण्याचा आदेश सर्व गट विकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना देण्यात  आला आहे. 

संभाव्य प्रभावी उपाययोजना
- पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत उदभवाचे बळकटीकरण करणे.
-  जल व मृद संधारणाची कामे हाती  घेणे.
- सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सुचना घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे
- कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनिकरण आदी विभागांचा सहभाग घेणे.
- सर्व विभागांच्या मदतीने कृती आराखडा तयार करणे.
- सर्व विभागांकडील उपलब्ध निधीचा पुरेपूर वापर करणे.

जिल्ह्यातील कायम टॅकरग्रस्त गावांना कायमस्वरूपी टॅकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गावनिहाय कृती आराखडे तयार करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT