थेरगाव - खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत विजयाचा आनंद साजरा केला.
थेरगाव - खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत विजयाचा आनंद साजरा केला. 
पुणे

Election Results : दुसऱ्यांदा विजयाचे वेगळे महत्त्व

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद होताच. मात्र, या वेळी या विजयाला वेगळे महत्त्व होते. त्यामुळे या विजयाचे वर्णन शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशी भावना वडीलबंधू यांची होती.

गेल्या चार दिवसांपासून पंचक्रोशीतील त्यांचा गोतावळा घरी आला होता. मतमोजणीला सुरवात झाल्यावर सर्वजण टीव्हीसमोर बसून निकाल पाहत होते. सकाळी साडेनऊपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडा ताणही होता. मात्र, साडेअकरानंतर बारणे यांना ८० हजार मतांची आघाडी मिळाल्यावर हळूहळू कार्यकर्त्यांची, नातेवाइकांची गर्दी वाढण्यास सुरवात झाली. जसजसे निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले, तसतसे वातावरण फुलून गेले. सर्वजण बारणे यांनी कशा पद्धतीने विजय मिळविला, याबद्दल चर्चा करीत होते.

वडीलबंधू हिरामण बारणे यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू थांबत नव्हते. त्यांना अर्धांगवायूचा त्रास असतानाही त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येकाचे ते स्वागत करीत होते. ते मोबाईलवरून आप्तेष्टांना अप्पांचाच विजय निश्‍चित असल्याचे सांगत होते. ‘‘आपल्या भावाने मिळविलेल्या या विजयाचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही, अप्पांचा आम्हाला अभिमान आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बारणे यांच्या सात बहिणी सकाळीच चिंचोळी, पाषाण, वाकड, बालेवाडी येथून आल्या. त्यात रुक्‍मिणी कस्पटे, रत्नप्रभा जाधव, जनाबाई बालवडकर, इंद्रायणी बालगुडे, अश्‍विनी जाधव, संगीता रणपिसे, मीना पवार यांनी एकमेकींना शुभेच्छा देत सेल्फी काढून घरात एकच जल्लोष सुरू झाला.

आपल्या भावाने मिळविलेल्या यशाच्या आनंदात त्या नाचू लागल्या. माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला असल्याचे त्या सांगत होत्या.

बारणे यांच्या पत्नी सरिता, सूनबाई कावेरी, नीता बारणे, मुलगा विश्‍वजित, पुतणे महेश, एकोणीस भाचेमंडळी प्रचंड खूष झाली होती, संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवून घरातच जल्लोष सुरू केला. त्यांच्या विजयाबद्दल भाऊ-बहिणीला शुभेच्छा देत होते. या विजयाचे आम्ही जंगी स्वागत करण्याचे कुटुंबीयांनी ठरविले असल्याचे सून कावेरी यांनी सांगितले.

बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे म्हणाल्या, ‘‘मावळ मतदारसंघातील मतदारांनी धनशक्तीला धिक्कारले आहे. मतदारांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विकासकामांना स्वीकारल्याची पावती दिली आहे. जनतेवर विश्‍वास असल्याने या विजयाची खात्रीच होती. मी सगळ्या मतदारांचे आभार मानते.’’

शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजप,शिवसेना युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना आम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघातून चांगली आघाडी दिली. आमच्या सर्व नगरसेवकांनीही चांगले काम केले. किमान ३८ ते ४० हजारांच्या मतांची आघाडी दिल्याचा आमचा अंदाज आहे. - - महेश लांडगे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT