पुणे

Loksabha 2019 : लगबग... व्यूहरचना आणि पोटपूजा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीकडून शेवटच्या चार-पाच दिवसांतील प्रचाराची व्यूहरचना आखण्यात आली आहे. ती जाणून घेण्यासाठी सोमवारी दुपारी दीड ते तीन या वेळेत महाआघाडीच्या काळभोरनगर व महायुतीच्या खराळवाडी येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयांत भेट दिली. तेथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून, ‘रखरखत्या उन्हातही जोरदार प्रचार’ सुरू असल्याचे जाणवले. 

महाआघाडीची भिस्त वॉर्डस्तरीय कार्यकर्त्यांवर

‘नाही, नाही..., तुम्ही अजिबात इकडे फिरकू नका. तुमच्या तुमच्या वॉर्डात लक्ष ठेवा. लोकांना घरी जाऊन भेटा. प्रचार पत्रके वाटा. त्याचे फोटो ग्रूपवर टाका. पंधरा-पंधरा, वीस-वीस जणींचे ग्रुप करा. एकीएकीने वीस-वीस महिलांशी संपर्क साधला तरी एका वेळी तीन-चारशे महिलांशी संपर्क साधू शकता,’ एक ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या मोबाईलवरून अन्य महिला कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचना करीत होत्या. काही कार्यकर्ते कोपरा सभा, बैठकांच्या नियोजनाबाबत चर्चा करीत होते.
महाआघाडीच्या कार्यालयात एक महिला पदाधिकारी फोनवरून वॉर्डातील महिला कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचना देत होत्या. त्यावरून, वॉर्ड व ब्लॉक स्तरावरील पक्षाच्या महिला, तरुण, कामगार, ज्येष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, मागासवर्गीय अशा वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाणवले. काही ज्येष्ठ कार्यकर्ते कोपरा सभा, बैठकी, प्रचार फेऱ्या, प्रचार पत्रके वाटणे याचे नियोजन करीत होते. प्रशस्त सभागृह केले आहे. त्यात गाद्या टाकून बैठक व्यवस्था केली आहे. छोटी सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी येथे घेतल्या जातात. संगणकाद्वारे खर्चाची नोंदणी ठेवली जात आहे.

परवानगी मिळणे अवघड
कोपरा सभा असो वा प्रचार फेरी, याची परवानगी पोलिस व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागते. त्यासाठी सभा घेणार असलेले ठिकाण, तेथील रहिवाशांचे ना हरकत पत्र, सभेची वेळ, वक्ता अशी सर्व माहिती द्यावी लागत आहे. शिवाय परवानगीसाठी अर्ज दिल्यानंतर २४ तासांच्या आतील वेळ मिळत नाही. अर्ज दिल्यापासून २४ तासांनंतरची वेळ मिळते. त्यामुळे सभा असो वा प्रचार फेरी याची परवानगी घेणे अवघड असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

महायुतीच्या प्रचारावर भाजपचा वरचष्मा
भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीच्या कार्यालयात बघितले. तिथे कार्यकर्ते जेवण करीत होते. प्रचाराचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उमेदवाराच्या पंधरा दिवसांच्या प्रचाराचे वेळापत्रक सूचना फलकावर लावलेले होते. त्यातील कोपरा सभांचे नियोजन, त्यात भाषण करणाऱ्या वक्‍त्यांची नावे होती. मात्र, प्रचार यंत्रणेच्या सूत्रबद्ध नियोजनावर भाजप कार्यकर्त्यांचा वरचष्मा आढळला. 
महायुतीच्या खराळवाडी कार्यालयात ३०-४० कार्यकर्ते दुपारचे भोजन करीत होते. दर्शनी भागातच उमेदवाराच्या प्रचाराचे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या कोपरा सभांचे वेळापत्रक फलकावर लावलेले होते. 

कोपरा सभांच्या गाव व परिसरानुसार वेळा, दोन सभांमधील वेळा व सभेत बोलणाऱ्या वक्‍त्यांची नावे नमूद केलेली होती. शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रचार यंत्रणेवर भाजपचा वरचष्मा असल्याचे जाणवले. भाजपने वॉर्डातील प्रचाराची जबाबदारी त्या-त्या वॉर्डातील पक्षाच्या नगरसेवकांवर टाकलेली आहे. त्यांच्याकडून रोजचा अहवाल प्रचाराच्या छायाचित्रांसह मागविला जात आहे. एकंदरीत  उमेदवार शिवसेनेचा असला तरी, प्रचाराची सर्व सूत्रे भाजपच्या हाती असल्याचे दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT