पुणे

मावळ पंचायत समिती सभापती, उपसभापती बिनविरोध

CD

वडगाव मावळ, ता.९ : मावळ पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनीता मनोहर येवले यांची, तर उपसभापतीपदी साहेबराव नारायण कारके यांची बिनविरोध निवड झाली. सुमारे तीस वर्षांनंतर पंचायत समितीमध्ये पक्षाचे पदाधिकारी विराजमान झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्व पंधरा जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले विशेष सभा आयोजित केली होती. तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात, गटनेते दिलीप ढोरे यांच्यासह साहेबराव कारके, योगेश लोहोर, राजेंद्र कडलक, समीर जाधव, सुनीता येवले, प्राची गायकवाड, आशा मोरमारे, रेश्मा देवकर, शैला कालेकर हे सर्व नवनिर्वाचित यावेळी उपस्थित होते.
सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून या पदासाठी चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले यांचा, तर उपसभापती पदासाठी सोमाटणे गणातून विजयी झालेले साहेबराव कारके यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सुरेंद्र नवले यांनी केली. त्यानंतर प्रशासनातर्फे दोघांचा सत्कार करण्यात आला.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार सोहळा
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गटनेते, खरेदी विक्री संघाचे सभापती व उपसभापती आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, सुरेश चौधरी, काळुराम मालपोटे, नारायण ठाकर, दीपक हुलावळे, माउली ठाकर, कृष्णा कारके, रिपाइंचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, नगराध्यक्षा अबोली ढोरे, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत आदी उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले, ‘‘नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे. स्व. अजित पवार यांच्या स्वप्नातील विकसित मावळ तालुका उभा करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू.’’
‘‘पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सहकार्याने मावळच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू,’’ असा विश्वास सुनीता येवले यांनी व्यक्त केला. कारके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT